मुंबई, 2 जानेवारी : न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ख्रिस क्रेन्स (Chris Cairns) काही महिन्यांपूर्वी मृत्यूशी झुंज देत होता. क्रेन्सला सुरुवातीला हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याच्या ऱ्हदयातील धमन्या बिघडल्या होत्या. तसेच त्याला पॅरेलिसिसचा अटॅकही आला होता. त्यामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये अनेक ऑपरेशन्स करावी लागली. या मोठ्या ऑपरेशननंतर क्रेन्स आता घरी परतला आहे. ख्रिस क्रेन्स घरातील अंगणात व्हिलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये क्रेन्स व्हिलचेअरवर बसला असून त्याच्या हातामध्ये बॅट आहे. मृत्यूच्या दारातून परतल्यानंतरही क्रेन्सचं क्रिकेटबद्दलचं प्रेम कमी झालेलं नाही. त्याच्या मनात आजही क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. हेच या फोटोतून दिसत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
क्रेन्सची कारकिर्द ख्रिस क्रेन्सनं 1989 ते 2006 या कालावधीमध्ये 62 टेस्ट, 215 वन-डे आणि 2 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली केनियामध्ये झालेली पहिली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा क्रेन्सच्या शतकाच्या जोरावरच न्यूझीलंडनं भारताता पराभव करुन जिंकली होती. त्याच्या काळातील दिग्गज ऑल राऊंडरमध्ये क्रेन्सचा समावेश होता. त्याचे वडील लान्स क्रेन्स हे देखील न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. नव्या स्टारचा उदय! 13 वर्षाच्या मुलानं केले 425, 235, 367* रन ख्रिस क्रेन्स इंडियन क्रिकेट लीग (ICL) या क्रिकेट स्पर्धेतही खेळला होता. तसेच त्यानंतरच्या काळात त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. या प्रकरणात 2015 साली कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. सध्या तो एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे.