JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / चांगल्या कामगिरीनंतरही इंग्लंडचा बॉलर निलंबित, 8 वर्षांपूर्वीच्या चुकीचा फटका

चांगल्या कामगिरीनंतरही इंग्लंडचा बॉलर निलंबित, 8 वर्षांपूर्वीच्या चुकीचा फटका

पदार्पणातील टेस्टमध्ये 7 विकेट्स घेणारा इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) करियरमधील दुसऱ्या टेस्टमध्येच निलंबित झाला आहे. सोशल मीडियावरील (Social Media) चूक त्याच्या मैदानावरील कामगिरीवर भारी पडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 7 जून : पदार्पणातील टेस्टमध्ये 7 विकेट्स घेणारा इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) करियरमधील दुसऱ्या टेस्टमध्येच निलंबित झाला आहे. सोशल मीडियावरील (Social Media) चूक त्याच्या मैदानावरील कामगिरीवर भारी पडली आहे. रॉबिन्सनननं 8 वर्षांपूर्वी आक्षेपार्ह ट्विट केले होते, त्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शिस्तपालन समितीचा रिपोर्ट येईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निलंबित केले आहे. त्यामुळे तो गुरुवारपासून एजबस्टनमध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. तो इंग्लंडची टीम सोडून त्याची कौंटी टीम असलेल्या ससेक्सला परत जाणार असल्याचं इंग्लंड बोर्डाने स्पष्ट केले आहे. रॉबिन्सनं मागितली माफी लॉर्ड्स टेस्टचा पहिला दिवस संपल्यानंतर रॉबिन्सनने लगेचच या प्रकरणी माफी मागितली. ‘माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी मी 8 वर्षांपूर्वी केलेल्या वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्वीटबाबत मला लाज वाटत आहे. मी वर्णभेदी किंवा लिंगभेदी नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. 8 वर्षांपूर्वी केलेल्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. तसंच यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता, बेजबाबदारपणे वर्तणूक केली. या गोष्टी समजण्याइतकं माझं वयही तेव्हा नव्हतं. तरीही मी माफी मागतो,’ असं रॉबिन्सन म्हणाला होता. त्याची ही माफी निलंबन रोखण्यासाठी पुरेशी ठरली नाही.

संबंधित बातम्या

इंग्लंडचा कॅप्टन जो रुट याने या प्रकरणावर बोलताना सांगितले की, “मैदानातील कामगिरीच्या आधारावर रॉबिन्सनचे पदार्पण खास होते. मात्र मैदानाच्या बाहेर त्याने केलेली चूक अस्वीकार्य आहे. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये बॅटनं योगदान दिलं. त्याचबरोबर चांगली बॉलिंग देखील केली. इशांतला मागे टाकलं, रिचर्ड हॅडलींचा विक्रम मोडला, टीम साऊदीचा पराक्रम! तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकतो. मात्र मैदानातील बाहेरच्या गोष्टींचा विचार केला तर ते आमच्या खेळामध्ये मान्य नाही. याबाबत सर्वांनाच कल्पना आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या