JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आगामी टेस्ट सीरिजपूर्वी इंग्लंडला धक्का, 'हा' दिग्गज खेळाडू आऊट

आगामी टेस्ट सीरिजपूर्वी इंग्लंडला धक्का, 'हा' दिग्गज खेळाडू आऊट

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archaer) न्यूझीलंड विरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून आऊट झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 17 मे: इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archaer) न्यूझीलंड विरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून आऊट झाला आहे. ससेक्स विरुद्ध कौंटी मॅच खेळताना त्याच्या मनगटाची दुखापत पुन्हा एकदा बळावली. आर्चर गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीनं त्रस्त आहे. तो या दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धही त्याला खेळता आले नव्हते. आर्चर दुखापतीनंतर ससेक्सकडून पहिल्यांदाच खेळत होता. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 29 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पाच ओव्हर बॉलिंग केल्यानंतरच त्याची दुखापत बळावली. आर्चरच्या हाताचं काही आठवड्यांपूर्वी ऑपरेशन झालं आहे.  इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन टेस्ट मॅचची सीरिज 2 जून पासून सुरु होणार आहे.

संबंधित बातम्या

T20 वर्ल्ड कप  लक्ष्य जोफ्रा आर्चरच्या क्रिकेटला दुखापतींमुळे वारंवार ब्रेक लागला आहे.या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या वर्ल्ड कपपूर्वी आर्चर पूर्ण फिट व्हावा अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची (ECB) इच्छा आहे. इंग्लंडची टीम यावर्षी अ‍ॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. 9 डिसेंबरपासून ही सीरिज सुरु होईल. ‘मला 10-12 वर्ष रात्री नीट झोप लागत नव्हती’ सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट ससेक्सचे कोच इयान सॅलिसबरी यांनी आर्चर सोमवारी बॉलिंग करणार नसल्याचं सांगितलं. जोफ्रा सारखा प्रमुख बॉलर बॉलिंग करु शकत नाही हे एका कोचसाठी निराशाजनक आहे. पण खेळाडू जखमी झाल्यावर या गोष्टी घडतात. हेच तर आयुष्य आहे, असं त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या