JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL पूर्वी शाहरूख खानच्या टीमचा बोलबाला, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर धडक

IPL पूर्वी शाहरूख खानच्या टीमचा बोलबाला, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर धडक

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेचा शेवटचा टप्पा आता जवळ येत आहे. या स्पर्धेत सध्या शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) टीमचा बोलबाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 सप्टेंबर : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेचा शेवटचा टप्पा आता जवळ येत आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीतील आता फक्त 6 लढती बाकी आहेत. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल होणार आहेत. या स्पर्धेत शाहरूख खानच्या ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) या टीमनं अन्य सर्व टीमना मागं टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या या टीमनं मागच्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. पोलार्डच्या टीमनं ख्रिस गेलच्या (Chris Gayle) कॅप्टनसी खाली खेळणाऱ्या सेंट किट्सला मागं टाकलं आहे. सेंट किट्सनं या स्पर्धेतील पहिल्या 5 मॅच सलग जिंकत स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. पण सहाव्या मॅचमध्ये कॅप्टन ब्राव्हो जखमी झाला  आणि गेल टीमचा कॅप्टन बनला. ब्राव्हो जखमी झाल्यानं टीमचं संतुलन बिघडलं असून त्यांनी पुढील सलग तीन मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता पहिला क्रमांक गमावला आहे.

संबंधित बातम्या

टीकेआर आणि सेंट किट्स या दोन्ही टीमचे 10-10 पॉईंट्स आहेत. पण टीकेआरचा रनरेट हा +1.037 आहे. तर सेंट किट्सचा -0.619 त्यामुळे गेलची टीम सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. अन्य टीमचा विचार केला तर आंद्रे रसेलची जमैका, फाफ ड्यू  प्लेसीची सेंट लूसिया आणि निकोस पूरनच्या गयाना  या सर्व टीमचे 8 मॅचनंतर प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. अश्विनच्या निवडीसाठी होता रोहितचा आग्रह, विराटनं ठेवली होती ‘ही’ अट नेट रनरेटचा विचार केला तर  या तीन टीममध्ये जमैकाचा रनरेट सर्वात चांगला आहे. त्यामुळे जमैका पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या, सेंट लूसिया चौथ्या तर गयाना पाचव्या क्रमांकावर आहे. बार्बोडोसची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली आहे. 6 पैकी फक्त 2 सामने त्यांनी जिंकले आहेत. पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या बार्बोडसचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या