मुंबई, 19 फेब्रुवारी : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) खराब फॉर्म रणजी स्पर्धेतही (Ranji Trophy 2022) कायम आहे. मुंबई विरूद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये (Mumbai vs Saurashtra) पुजारा शून्यावर आऊट झाला आहे. पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच काळापासून ‘आऊट ऑफ फॉर्म’ आहे. टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत भरपूर रन करण्याची सूचना बीसीसाीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केली होती. पुजारा पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. सौराष्ट्राकडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला पुजारा फक्त 4 बॉल मैदानात टिकला. त्याला मोहीत अवस्थीनं LBW केले. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची लवकरच निवड होणार आहे. या खराब खेळीमुळे पुजाराची टीम इंडियातून हकालपट्टी अटळ मानली जात आहे.
अजिंक्यचं शतक चेतेश्वर पुजाराप्रमाणेच फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) या मॅचमधील खेळाकडे सर्वांचं लक्ष होतं. अजिंक्यनं मुंबईकडून खेळताना शतक झळकावलं आहे. त्याने 290 बॉलमध्ये 17 फोर आणि 2 सिक्स यांच्या मदतीनं 129 रन काढले. अजिंक्यनं यावेळी सरफराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी 252 रनची भागिदारी केली. Ranji : SRH च्या खेळाडूनं फक्त 68 बॉलमध्ये झळकावले शतक, 19 फोर आणि 2 सिक्सचा वर्षाव मुंबईकडून सरफराजनं सर्वाधिक 275 रन केले. त्याच्या खेळीमुळे मुंबईनं पहिली इनिंग 7 आऊट 544 रनवर घोषित केली. मुंबईच्या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना सौराष्ट्राची सुरूवात खराब झाली. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत त्यांचा स्कोअर 4 आऊट 126 असा होता. सौराष्ट्राची टीम अजून 418 रननं पिछाडीवर होती. उद्या (रविवार) या मॅचचा शेवटचा दिवस आहे.