मुंबई, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाची ‘स्पीड गन’ अशी ब्रेट लीची (Breet Lee) ओळख होती. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंची परीक्षा पाहिली. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरुद्धचं त्याचं द्वंद चांगलंच गाजलं. ब्रेट ली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. सध्या तो टीव्हीवर कॉमेंट्री करतो. पण, हातामध्ये बॉल आल्यावर त्याची जादू आजही कायम आहे. ब्रेट लीची मॅच नुकतीच त्याच्या मुलासोबत झाली. क्रिकेटच्या मैदानात बॅट घेऊन समोर मुलगा असला तरी त्याला लीने अजिबात दया दाखवली नाही. घरातील बागेत झालेल्या या अनोख्या लढतीमध्ये ब्रेट लीच्या मुलाच्या हातामध्ये बॅट होती आणि तो लीचा सामना करत होता. लीने टाकलेला बॉल मुलाला खेळता आलाच नाही, त्याचा मिडल स्टंप उडाला. मुलगा आऊट झाल्यावर ब्रेट लीने त्याच्या खास स्टाईलनं सेलिब्रेशन देखील केले.
ब्रेट लीने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच 2012 साली खेळली. त्यापूर्वी 2008 साली तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. लीने 9 वर्षांच्या टेस्ट करियरमध्ये 76 टेस्ट खेळल्या आणि त्यामध्ये 310 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याच्या नावावर 221 वन-डेमध्ये 380 तर 25 टी20 इंटरनॅशनलमध्ये 28 विकेट्स आहेत. Ashes Series गमावल्यानंतर अँडरसनचं ECB कडे बोट, बोर्डाकडे केली मोठी मागणी ब्रेट लीने आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन टीमचं प्रतिनिधित्व केले आहे.