JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोरोनामुळे रणजी स्पर्धा स्थगित! सौरव गांगुलीनं क्रिकेट संघटनांना दिलं मोठं आश्वासन, म्हणाला...

कोरोनामुळे रणजी स्पर्धा स्थगित! सौरव गांगुलीनं क्रिकेट संघटनांना दिलं मोठं आश्वासन, म्हणाला...

कोरना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्यामुळे बीसीसीआयनं (BCCI) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या विषयावर सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनेला पत्र लिहिले असून त्यामध्ये मोठे आश्वासन दिले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : कोरना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्यामुळे बीसीसीआयनं (BCCI) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केली आहे. रणजी ट्रॉफी, सीके नायुडू आणि महिलांची टी20 लीग स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. यापैकी रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा असून सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेला कोरोनाचा फटका बसला आहे. या सर्व विषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनेला पत्र लिहिले असून त्यामध्ये मोठे आश्वासन दिले आहे. ‘कोव्हिड 19 मुळे परिस्थिती बिघडल्यानं आम्हाला या वर्षीचे देशांतर्गत क्रिकेटचे सत्र स्थगित करावे लागले, याची तुम्हाला कल्पना आहे. कोरोनाच्या केस झपाट्याने वाढत आहेत. काही टीममध्ये याचे रूग्ण आढळले. यामुळे खेळाडू, अधिकारी आणि स्पर्धेतील संबंधित सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला होता. बीसीसीआय तुम्हाला आश्वासन देते की,  कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येताच देशांतर्गत क्रिकेटचा सिझन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्यात येतील. आम्ही या सत्रामध्ये स्पर्धा घेण्यासाठी कटीबद्ध आहोत. बोर्ड सुधारित योजनेसह लवकरच तुमच्यापर्यंत पोहचेल. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.’ असे आश्वासन गांगुलीने दिले आहे. डिअर रेड बॉल, मला एक संधी दे! टीम इंडियाचा खेळाडू झाला भावुक का स्थगित झाली स्पर्धा? बीसीसीआयने मंगळवारी ऑनलाईन बैठक घेऊन रणजी ट्रॉफी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.त्याआधी सोमवारी बंगालच्या रणजी टीममधल्या 7 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतरच रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर मुंबईचा ऑल राऊंडर शिवम दुबे आणि एका सपोर्ट स्टाफलाही कोरोना झाल्याचे उघड झाले. त्यामुले मुंबई आणि बंगालमधील सराव सामनाही रद्द करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या