JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, दादाच्या कोरोना टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट

सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, दादाच्या कोरोना टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 1 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या तपासणीमध्ये कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले. निरुपा गांगुली यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलंय. तसंच चार डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली आहे.  दरम्यान सौरव गांगुलीची कोरोना चाचणीही यावेळी करण्यात आली, ती निगेटीव्ह आली आहे. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहशिष गांगुली यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी दोन जानेवारी रोजी गांगुलीला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर  पुन्हा एकदा जानेवारी महिन्याच्या शेवटी तब्येत खालावल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या आजारपणानंतर गांगुली बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. पाकिस्तानी बॉलरच्या चिथावणीनंतर पोलार्डच्या बॅटमधून बरसली आग! 7 बॉलमध्ये काढले 30 रन, पाहा VIDEO भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टच्या दरम्यान गांगुली उपस्थित होता. आता या महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या