मुंबई,16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) भारतीय टेस्ट टीमची कॅप्टनसी देखील सोडली आहे. दक्षि्ण आफ्रिकेविरुद्धची सीरिज 1-2 या फरकाने गमावल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. विराटने यापूर्वी टी20 टीमची कॅप्टनसी सोडली होती. तर त्याची वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. विराटच्या या निर्णयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुलीने केलेला दावा फेटाळला होता. त्यावेळी विराट आणि बीसीसीआयमधील मतभेद समोर आले होते. गांगुलीने ट्विट करत याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. ‘विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं तीन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी केली. हा विराटचा वैयक्तिक निर्णय आहे. बीसीसीआयला या निर्णयाचा आदर आहे. भविष्यात टीमला नव्या उंचीवर नेणाऱ्या टीममधील विराट महत्त्वाचा सदस्य असेल. तो एक दमदार खेळाडू आहे. खूप छान विराट. ’ अशी प्रतिक्रिया गांगुली यांनी व्यक्त केली आहे.
विराट-बीसीसीआयचा वाद गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा वाद सुरू आहे. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराट कोहलीला आम्ही टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगितलं होतं, पण त्याने ऐकले नाही. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटची वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी करण्यात आली, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच खरी ठरली धोनीची ‘ती’ भविष्यवाणी! सौरव गांगुली यांचा हा दावा विराट कोहलीने फेटाळून लावला. मला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं नव्हतं, तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची टेस्ट टीम निवडण्याच्या दीड तास आधी मला तू आता वनडे टीमचा कर्णधारही असणार नाहीस, असं निवड समितीने सांगितल्याचा दावा विराट कोहलीने केला होता.