JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / द्रविड-गांगुलीवरील खुलाशानंतर साहा अडचणीत! BCCI करणार 'ही' कारवाई

द्रविड-गांगुलीवरील खुलाशानंतर साहा अडचणीत! BCCI करणार 'ही' कारवाई

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याशी झालेली चर्चा सार्वजनिक केल्यानंतर टीम इंडियाचा विकेट किपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) अडचणीत आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याशी झालेली चर्चा सार्वजनिक केल्यानंतर टीम इंडियाचा विकेट किपर ऋद्धीमान साहा  (Wriddhiman Saha) अडचणीत आला आहे. या प्रकरणात बीसीसीआय त्याला कारणे दाखवा नोटीस बजावू शकते. श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमध्ये निवड न झाल्यानं साहा नाराज झाला होता. त्यानंतर त्याने आपल्याला राहुल द्रविडनं निवृत्त होण्याचा सल्ला दिला, असा खुलासा केला होता. बीसीसीआयनं वार्षिक करार केलेल्या खेळाडूंमध्ये साहाचा समावेश आहे. त्याचे हे वक्तव्य नियमांचा भंग करणारे आहे. या करारातील कलम 6.3 नुसार, ‘कोणताही खेळाडू, अधिकारी खेळाच्या दरम्यान घडलेली घटना, तंत्रज्ञानाचा वापर आणि निवड प्रक्रिया संदर्भातील कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करण्याची परवानगी नाही. यामध्ये बीसीसीआयच्या मते प्रतिकूल असलेल्या, खेळ भावनेला धक्का देणाऱ्या किंवा टीम हितामध्ये नसलेल्या गोष्टींचा समावेश आहे. बीसीसीआय कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, ‘या प्रकरणात बीसीसीआय ऋद्धीमान साहाची चौकशी करू शकते. केंद्रीय कराराचा भाग असलेला खेळाडू असूनही त्याने निवड प्रक्रियेवर मत कसं व्यक्त केलं. बीसीसीआय अध्यक्षांनी त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही साहानं बंद खोलीत द्रविडशी झालेली चर्चा सार्वजनिक का केली? हा प्रश्न बीसीसीआय त्याला विचारू शकते. ‘साहाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यावर आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्ही सर्व सध्या व्यस्त आहोत. काही दिवसांमध्ये या विषयावर निर्णय घेऊ, ‘असे धूमल यांनी स्पष्ट केले. Pro Kabaddi Final : प्रो कबड्डी लीगची फायनल आज, कधी आणि कुठे पाहणार Live? काय म्हणाला होता साहा? टीम इंडियातील जागेबाबत काळजी करू नये असे आश्वासन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्याला दिले होते, असा दावा साहानं केला आहे. ‘मी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध औषधं घेऊन नाबाद 61 रन केले होते. त्यावेळी दादाने माझे व्हॉट्सअपवर अभिनंदन केले. मी बीसीसीआय अध्यक्ष असेपर्यंत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, असे आश्वासन त्याने मला दिले होते. बोर्डाच्या अध्यक्षांचे हे मत ऐकून माझा आत्मविश्वास वाढला होता. पण, इतक्या लवकर परिस्थिती कशी बदलली? हे मला समजत नाही.’ असा सवाल साहाने केला होता. साहाने हेड कोच राहुल द्रविडबाबतही गौप्यस्फोट केला. ‘टीम मॅनेजमेंटनं आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही, हे मला सांगितले होते. तसंच राहुल द्रविडने आपल्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता.’  असे साहाने जाहीर केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या