कोलकाता, 2 जानेवारी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) आढळले होते. त्यानंतर गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. गांगुलीच्या तब्येतीबाबत महत्त्वाचा खुलासा हॉस्पिटलच्या रिपोर्टमधून झाला आहे. सौरव गांगुली यांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण त्यांना ओमायक्रॉन नाही तर डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta plus variant) लागण झाल्याचे हॉस्पिटलच्या रिपोर्ट्समधून स्पष्ट झाले आहे. गांगुलीचे ओमायक्रॉन चाचणीमधील रिपोर्ट निगेटीव्ह आले असून डेल्टा प्लस व्हेरिएंट तपासणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ते पुढील 15 दिवस घरामध्येच डॉक्टर्सच्या देखरेखीमध्ये असतील, अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली आहे. गांगुलीला यावर्षी आधीही दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एन्जियोप्लास्टीही करण्यात आली. याचवर्षी गांगुलीचे भाऊ स्नेहशिष यांनाही कोरोनाची लागण झाली होती.गांगुली यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यानंतर व्यावसायिक कारणांसाठी त्यांनी बराच प्रवास केला आहे. 49 वर्षीय गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. ओमायक्रॉन रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. IND vs SA : श्रेयस आणि सिराजनं जल्लोषात केले नव्या वर्षाचे स्वागत, पाहा VIDEO वादामुळे चर्चेत
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी गांगुली आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील मतभेत जगासमोर आले होते. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया गांगुलीनी यांनी दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा खोडून काढला. त्यानंतर या वादावर गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी नुकताच गांगुली यांच्या वक्तव्याला दुजोरा देत विराटनं बीसीसीआयचं ऐकलं नाही, हे स्पष्ट केले आहे.