JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'या' खेळाडूंच्या त्रासाला कंटाळून बांगलादेशचा अंपायर सोडणार पद

'या' खेळाडूंच्या त्रासाला कंटाळून बांगलादेशचा अंपायर सोडणार पद

बांगलादेशमधील नुकतीच झालेली ढाका प्रीमियर लीग टी20 (Dhaka Premier League T20) खेळाडूंच्या गैरवर्तनाने गाजली. या गैरवर्तनाला कंटाळून अंपायरने पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून: बांगलादेशमधील नुकतीच झालेली ढाका प्रीमियर लीग टी20 (Dhaka Premier League T20) खेळाडूंच्या गैरवर्तनाने गाजली.  या स्पर्धेत बांगलादेशचा प्रमुख खेळाडू शाकिब अल हसनवर  (Shakib al Hasan) अंपायरवर भडकल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महमदूल्लाहने (Mahmudullah) देखील मैदानात अंपायरशी वाद घातला होता. बांगलादेशी खेळाडूंच्या गैरवर्तनाला कंटाळून त्या स्पर्धेतील अंपायरने पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मोनिरुज्जमां (Moniruzzaman) असं या अंपायरचं नाव आहे. त्यांचा आयसीसीच्या (ICC) इमर्जिंग अंपायरच्या यादीत समावेश आहे. महमदूल्लाहने गोंधळ घातला त्या मॅचमध्ये  ते टीव्ही अंपायर होते. त्याच्या व्यवहारामुळे निराश झाल्याचं त्यांनी ‘क्रिकबझ’ शी बोलताना सांगितले. " आता खूप झाले. मी अंपायरिंग करु शकत नाही. मला स्वाभिमान आहे, तो मी जपणार आहे. अंपायर चुका करु शकतो, पण त्याच्याशी या प्रकारचा व्यवहार होत असेल तर ते काम करण्यात काही अर्थ नाही. मी हे काम पैसे कमावण्यासाठी करत नाही." या शब्दात त्यांनी निराशा व्यक्त केली. काय घडला होता प्रसंग? गाझी टँक क्रिकेटर्सचा कॅप्टन महमदूल्ला प्राईम बँक विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये गैरवर्तनाबद्दल लेव्हल 2 अंतर्गत दोषी आढळला आहे. अंपायरने अपिल फेटाळल्यानंतर तो पिचच्या बाजूलाच झोपला.  अंपायरनं सूचना केल्यानंतरही त्यानं खेळ पुढे सुरु करण्यास नकार दिला होता. मोनिरुज्जमां यांनी पुढे सांगितले की, “मी शाकिबच्या मॅचमध्ये सहभागी नव्हतो.  त्याने ज्या पद्धतीनं व्यवहार केला तो माझ्यासाठी खूप गंभीर आहे. महमदूल्लाहच्या मॅचमध्ये मी टीव्ही अंपायर होतो. मी तो सर्व घटनाक्रम जवळून पाहिला आहे, आता मी मी अंपायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियानंतर आणखी एका टीमविरुद्ध बरसला कोहलीचा सहकारी, बॅटींग आणि बॉलिंगमध्ये केली कमाल पण… मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा कर्मचारी नाही. मला अंपायरना बोर्डाकडून मिळणारे पैसे मिळत नाहीत. मला फक्त मॅच फिस मिळते.  खेळाबद्दलच्या प्रेमामुळे हे काम मी करत होतो. माझ्याशी आजवर कोणताही गैरव्यवहार झाला नाही. हे माझं भाग्य आहे. पण काय सांगावं कदाचित पुढच्या मॅचमध्ये माझाही अपमान होईल. उद्याच्या मॅचमध्ये काय होईल? याचा विचार करुन मला रात्रीची झोप घालवायची नाही, " असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या