JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लज्जास्पद! आफ्रिदीचा तोल ढासळला, SIX लगावणाऱ्या खेळाडूच्या अंगावर फेकला बॉल! VIDEO

लज्जास्पद! आफ्रिदीचा तोल ढासळला, SIX लगावणाऱ्या खेळाडूच्या अंगावर फेकला बॉल! VIDEO

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीनं (Shaheen Shah Afridi) 15 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या मॅचच्या दरम्यान एकदा आफ्रिदीनं त्याचा तोल गमावला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 नोव्हेंबर: पाकिस्तानची टीम सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये पाकिस्ताननं बांगलादेशचा (Pakistan vs Bangladesh) 8 विकेट्सनं पराभव करत तीन मॅचच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ढाकामध्ये झालेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीनं (Shaheen Shah Afridi) 15 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या मॅचच्या दरम्यान एकदा आफ्रिदीनं त्याचा तोल गमावला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आफ्रिदीनं बांगलादेशच्या सैफ हसनला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केले. त्यानंतर बांगलादेशच्या इनिंगमधील तिसरी ओव्हर तो टाकण्यासाठी आला. त्या ओव्हरच्या दुसऱ्या अफिफ हुसेननं जोरदार सिक्स लगावला. हुसेननं सिक्स लगावल्यानं आफ्रिदी चांगलाच संतापला होता. त्यानंतरचा बॉल हुसेननं बचावात्मक पद्धतीनं खेळला जो सरळ आफ्रिदीच्या हातामध्ये आला. त्यावेळी त्यानं हुसेनच्या अंगावर बॉल फेकून मारला.

संबंधित बातम्या

हुसेनला तो बॉल जोरात लागला. त्यानं बॅट सोडली आणि तो खाली पडला. त्यावेळी आफ्रिदीनं लगेच त्याचा हात उंचावला आणि तो हुसेनच्या जवळ गेला. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून आफ्रिदीची ही कृती फॅन्सनी खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचं म्हंटलं आहे. IND vs NZ: मॅच दरम्यान काय लपवत होता ऋषभ पंत? अखेर सत्य आलं समोर बांगलादेशनं दुसऱ्या टी20 मध्ये पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 108 रन केले. पाकिस्ताननं 18.1 ओव्हरमध्ये अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केलं. फखर झमानला (Fakhar Zaman) ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. त्यानं 51 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 57 रन काढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या