अॅडलेट, 30 नोव्हेंबर: दिर्घ काळानंतर फॉर्ममध्ये परतलेल्या डेव्हिड वॉर्नर(David Warner)ने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. पाकिस्तान(Pakistan)विरुद्धच्या अॅडलेट कसोटी सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले. डे-नाईट (Day Night)कसोटीच्या इतिहासात त्रिशतक करणारा वॉर्नर हा दुसरा फलंदाज ठरला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा वॉर्नर हा सातवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरच्या आधी अजहर अली याने डे-नाईट कसोटमध्ये त्रिशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. याआधी अॅशेस मालिकेत अपयशी ठरलेल्या वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्वत:ला सिद्ध केले. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करत वॉर्नरने इतिहास घडवला. त्याने 519 मिनिटे फलंदाजी केली. वॉर्नरने 389 चेंडूत त्रिशतक झळकावले. यात 37 चौकारांचा समावेश होता. या सामन्यात वॉर्नर 418 चेंडूत नाबाद 335 धावा केल्या. यात 39 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.
पाकिस्तानविरुद्धच्या त्रिशतकी खेळीच्या आधी कसोटीमध्ये वॉर्नरने 253 धावांची खेळी होती. ही खेळी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 2015मध्ये पर्थ येथे केली होती. अॅडलेट कसोटीत मोहम्मद अब्बासच्या चेंडूवर चौकार लावत त्याने त्रिशतक झळकावले. ही त्रिशतकी खेळी करताना वॉर्नरने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. अॅडलेट मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी 88 वर्षांपूर्वी म्हणजेच 1931-1932 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर 299 धावांची खेळी केली होती.
दिर्घ काळानंतर कसोटीत त्रिशतक वॉर्नरच्या या त्रिशतकी खेळीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये दिर्घ काळानंतर अशी खेळी झाली आहे. याआधी 2016मध्ये भारताच्या करुण नायर (Karun Nair) याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती. नायरने तेव्हा नाबाद 303 धावा केल्या होत्या. त्याआधी पाकिस्तानच्या अजहर अलीने 13 ऑक्टोबर 2016 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 302 धावा केल्या होत्या. अलीने झळकावलेले त्रिशतक हे डे-नाईट कसोटीमधील पहिले त्रिशतक होते. करुण नायर यांच्या शतकी खेळीनंतर वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावले. अॅडलेट मैदानावर प्रथमच एखाद्या फलंदाजाने त्रिशतकी खेळी आहे. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी करणारा वॉर्नर चौथा फलंदाज आहे. वॉर्नरच्या आधी गॅरी सोबर्स, मार्क टेलर आणि विरेंद्र सेहवाग यांनी पाकविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.