JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes : 2 वर्षानंतर टीममध्ये परतलेल्या खेळाडूचे शतक, ऑस्ट्रेलियाचा भक्कम स्कोअर

Ashes : 2 वर्षानंतर टीममध्ये परतलेल्या खेळाडूचे शतक, ऑस्ट्रेलियाचा भक्कम स्कोअर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या टेस्टमध्ये 2 वर्षांनी टीममध्ये परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅटरनं शतक झळकावले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिडनी, 6 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) शतक झळकावलं. ख्वाजाचे टेस्ट करिअरमधील हे नववे शतक आहे. ड्रेव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याने सिडनी टेस्टमध्ये ख्वाजाची निवड झाली होती. तो गेल्या दोन वर्षांपासून टेस्ट टीममधून बाहेर होता. टीममध्ये परत येताच त्याने शतक झळकावत मॅनेजमेंटची निवड योग्य ठरवली आहे. ख्वाजानं टी ब्रेकपूर्वी इंग्लंडचा स्पिनर जॅक लीचच्या बॉलिंगवर तीन रन काढत शतक पूर्ण केले. त्याने 2011 साली याच मैदानावर अ‍ॅशेस सीरिजमध्ये पदार्पण केले होते. आता दोन वर्षांनी इथे शतक झळकावले आहे. ख्वाजाचे सिडनीच्या ग्राऊंडवरील हे दुसरे टेस्ट शतक आहे.

ख्वाजाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये मजबूत स्कोअर उभा केला. ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग 8 आऊट 416 रनवर घोषित केली. ख्वाजानं 137 रन काढले. तर स्मिथनं 67 रनची खेळी केली. ख्वाजानं सर्व बॅटर आऊट झाल्यानंतर बॉलर्सच्या मदतीने संघर्ष करत ऑस्ट्रेलियाला 400 रनचा टप्पा ओलांडून दिला. या टेस्टचा पहिला दिवसाचा काही खेळ पावसामुळे वाया गेला होता. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात टाकली आहे. ऑस्ट्रेलियानं या सीरिजमधील पहिली टेस्ट 9 विकेट्सनं, दुसरी 275 रनने आणि तिसरी एक इनिंग आणि 14 रनने जिंकली आहे. आता इंग्लंडला प्रतिष्ठा वाचवण्यासाठी उर्वरित 2 टेस्टमध्ये पराभव टाळणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाच्या 416 रनचा पाठलाग करताना इंग्लंडनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बिनबाद 13 रन केले आहेत. Ashes : इंग्लंडच्या 2 दिग्गजांमध्ये Live कार्यक्रमात वाद, Video Viral

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या