JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes : इंग्लंडच्या 2 दिग्गजांमध्ये Live कार्यक्रमात वाद, Video Viral

Ashes : इंग्लंडच्या 2 दिग्गजांमध्ये Live कार्यक्रमात वाद, Video Viral

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या तीन टेस्टमध्ये इंग्लंडनं निराशाजनक खेळ केला. त्यानंतर आता टीमच्या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये टीव्ही कार्यक्रमात जुंपली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) चौथी टेस्ट सध्या सिडनीमध्ये सुरू आहे.  या सीरिजमधील पहिल्या तीन्ही टेस्ट गमावून इंग्लंडनं मालिका यापूर्वीच गमावली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानावर निराशाजनक खेळ केला आहे. त्यानंतर आता टीमच्या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये टीव्ही कार्यक्रमात जुंपली. लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. इंग्लंडचा माजी ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) आणि माजी कॅप्टन एलिस्टर कुक (Alistair Cook) यांच्यात हा वाद झाला. हे दोघेही सध्या बीटी स्पोर्ट्स चॅनेलवर विश्लेषक आहेत. इंग्लंड टीमचे हेड कोच सध्या कोरोनामुळे टीमपासून दूर आहेत. त्यामुळे कॅप्टन जो रूट (Joe Root) या टेस्टमध्ये कोचचंही काम करत आहे. या विषयावर चर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद सुरू झाला. कूकचे मॅनेजमेंट चांगले नव्हते, असा टोला मोईन अलीनं यावेळी लगावला. त्यावेळी जो रूटनं मोईन अलीला सर्वाधिक वेळा टीममधून वगळले याची आठवण कूकनं करून दिली. त्यानंतर अलीनं रूटचा बचाव करत कूकच्या कॅप्टनसीमध्ये आपल्याला 1 ते 9 क्रमांकापर्यंत खेळावं लागलं, असं सांगितलं.

संबंधित बातम्या

मोईन पुढे म्हणाला की, ‘रूटचे कॅप्टन म्हणून खेळाडूंशी भावनिक नातं आहे. तो त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो. त्यावर कूकने तू माझ्या कॅप्टनसीवर टीका करत आहेस का? असे रागावून विचारले.  या प्रश्नावरही मोईन अली गप्प बसला नाही. तू असं समजू शकतोस, असं उत्तर त्याने दिले. मी कूकच्या कॅप्टनसीमध्ये बॅटने तर रूटच्या कॅप्टनसीमध्ये बॉलने अधिक चांगली कामगिरी केली असे सांगितले. IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमध्ये अश्विननं घेतली स्पेशल विकेट, 16 वर्षांचा संपला दुष्काळ

 मी मोईनसाठी योग्य जागा शोधत होतो, असे स्पष्टीकरण कूकने केले. त्यानंतर मोईननने कूकची प्रशंसा केली. जो रूट खेळाडूंसोबत जास्त वेळ घालवतो याचा अर्थ कूकला खेळाडूंची पर्वा नव्हती असा होत नाही, असे मोईन यावेळी म्हणाला. मोईन अलीला आगामी आयपीएल सिझनसाठी चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) रिटेन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या