मेलबर्न, 27 डिसेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या टेस्टलाही कोरोनाचा फटका बसला आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड टीमच्या कॅम्पमधील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाले. टीमच्या कुटुंबीयांमधील 2 जण आणि सपोर्ट स्टाफमधील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे वृत्त जाहीर होताच एकच खळबळ उडाली. मेलबर्न टेस्टचा आज (सोमवार) दुसरा दिवस आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममधील सर्व खेळाडूंची सकाळी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे रिपोर्ट्स येईपर्यंत इंग्लंडच्या सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याची सूचना देण्यात आली होती. सर्व खेळाडूंचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करण्यात आला. कॉमेंटेटरलाही कोरोना दरम्यान, अॅशेस सीरिजचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या चॅनेल 7 मधील एका कॉमेंटेटरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याला तातडीने वेगळं करण्यात आलं आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून बिग बॅश लीगमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या तीन जणांची मेलबर्न टेस्टच्या पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे. चॅनेलच्या वतीनं अधिकृत ट्विट करत कॉमेंटेटरला कोरोना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आहेत. ऑस्ट्रेलियानं 1 आऊट 61 या स्कोअरवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. ओली रॉबिन्सननं नाईट वॉचमन नॅथन लायनला आऊट केले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ देखील झटपट परतले. इंग्लंडची पहिली इनिंग 185 रनवर संपुष्टात आली आहे. 5 टेस्टच्या या सीरिजमध्ये इंग्लंड 0-2 ने मागे आहे. Ashes Series : ‘क्रिकेट ऑस्टेलिया’त खळबळ, महिलेसोबत अश्लील डान्स केल्याचा खेळाडूवर आरोप