JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अनिल कुंबळेचा Perfect 10 रेकॉर्ड रोखण्यासाठी पाकिस्ताननं केला होता खास प्लॅन

अनिल कुंबळेचा Perfect 10 रेकॉर्ड रोखण्यासाठी पाकिस्ताननं केला होता खास प्लॅन

भारतीय क्रिकेट फॅन्स 7 फेब्रुवारी 1999 हा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत. आजच्या दिवशी अनिल कुंबळेनं (Anil Kumble) पाकिस्तानला ‘दस का दम’ दाखवला होता. कुंबळेचा हा रेकॉर्ड रोखण्यासाठी पाकिस्तानची रडीचा डाव खेळण्याची तयारी होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट फॅन्स 7 फेब्रुवारी 1999 हा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत. आज 7 तारीख आहे. पण, आजच्या दिवशी अनिल कुंबळेनं (Anil Kumble) पाकिस्तानला ‘दस का दम’ दाखवला होता. भारताच्या महान लेग स्पिनरनं पाकिस्तान विरूद्धच्या एकाच इनिंगमध्ये सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. हा ऐतिहासिक रेकॉर्ड करणारा कुंबळे हा जिम लेकर यांच्यानंतरचा दुसराच बॉलर बनला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 1999 साली दिल्लीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये कुंबळेनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. या सीरिजमधील पहिली टेस्ट पाकिस्ताननं जिंकली होती. त्यामुळे दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये भारताला विजय आवश्यक होता. मॅचच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी 420 रनचे टार्गेट होते. या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना सईद अन्वर आणि शहिद आफ्रिदी या जोडीनं एकही विकेट न गमावता 101 रनची भागिदारी केली होती. अन्वर आणि आफ्रिदीची यांची बॅटींग पाहून भारतीय फॅन्स चमत्काराची प्रार्थना करू लागले. देवानं त्यांची प्रार्थना मान्य केली. त्यानंतर कुंबळेनं जो चमत्कार केला, त्याचा कुणीही विचारही करू शकत नाही. क्रिकेटच्या इतिहासात तसं फक्त एकदा झाले होते. आता नुकतेच काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं भारताविरुद्ध एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. भारताला U19 World Cup जिंकवणाऱ्या कोचने केली होती पाकिस्तानची धुलाई, एका रात्रीत झाला होता स्टार! पाकिस्तानचा होता खास प्लॅन अनिल कुंबळे 10 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्वार होता, त्यावेळी पाकिस्तानचा फास्ट बॉलर वकार युनूस हा रेकॉर्ड होऊ नये म्हणून कोणत्याही थरावर जाण्यासाठी तयार होता. पाकिस्तानचा माजी कॅप्टन वासिम अक्रम यानेच हा खुलासा केला आहे. कुंबळेचा रेकॉर्ड होऊ नये म्हणून वकारची रन आऊट होण्याची तयारी होती. पण, त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. कुंबळेनं अक्रमला आऊट करत 10विकेट्स घेण्याच्या ऐतिहासिक रेकॉर्डवर शिक्कामोर्तब केले. अनिल कुंबळेच्या या रेकॉर्डमुळे भारताने पाकिस्तानचा टेस्ट क्रिकेटमध्ये 23 वर्षांनी पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या