JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारतीय खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलीनंतर वडिलांचंही निधन! त्यानंतरही मॅच पूर्ण करण्याचं दाखवलं धैर्य

भारतीय खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलीनंतर वडिलांचंही निधन! त्यानंतरही मॅच पूर्ण करण्याचं दाखवलं धैर्य

बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोळंकी (Vishnu Solank) सध्या आयुष्यातील सर्वात खडतर काळातून जात आहे. त्याच्या नवजात मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोळंकी (Vishnu Solank) सध्या आयुष्यातील सर्वात खडतर काळातून जात आहे. त्याच्या नवजात मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तो धक्का विष्णूनं सहन केला. मुलीवर अंत्यसंस्कार करून तो रणजी मॅच खेळण्यासाठी टीममध्ये परतला. त्याने चंदीगड विरूद्ध दमदार शतक झळकावले. मुलीच्या जाण्याचा आघात ताजा असतानच रविवारी त्याच्या वडिलांचे निधन झाले. बडोदा विरूद्ध चंदीगड यांच्यातील मॅचच्या शेवटच्या दिवशी विष्णूचे वडील गेले. ही मॅच सुरू असताना त्याला टीमच्या मॅनेजरनी त्याला बोलावून ही वाईट बातमी सांगितली. विष्णूला तातडीनं घरी जाण्याची परवानगी टीम मॅनेजमेंटनं दिली होती. विष्णूनं त्या परिस्थितीमध्येही असमान्य धैर्य दाखवत संपूर्ण मॅच खेळण्याचा निर्णय घेतला. विष्णूचे वडील गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झूंज रविवारी अखेर संपली. या अवघड परिस्थितीमध्येही विष्णूनं असामान्य धैर्य दाखवत मॅच खेळण्याचा निर्णय घेतला. टीमबद्दलच्या त्याच्या कमिटमेंटला सलाम, अशी भावना बडोद्याचा कॅप्टन केदार देवधरने व्यक्त केली आहे. विष्णूला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहाता आले नाही. त्याने ड्रेसिंग रूममध्ये एका बाजूला बसून फोनवरच वडिलांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं, त्याला या अवस्थेत पाहणे हा मोठा भावुक प्रसंग होता, अशी भावना केदारनं ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केली आहे. IND vs SL : विजयानंतर कॅप्टन रोहितचा सहकाऱ्यांना खास मेसेज, टीममधील जागा… बडोदा विरूद्ध चंदीगड मॅचमध्ये विष्णूच्या शतकामुळे बडोद्यानं पहिल्या इनिंगमध्ये 517 रन केले. चंदीगडच्या 168 रनच्या धावसंख्येला उत्तर देताना त्यांनी मोठी आघाडी घेतली. चंदीगडनं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 413 रन करत मॅच ड्रॉ केली. पण, बडोद्याला पहिल्या इनिंगच्या आघाडीचे पॉईंट्स मिळाले आहेत. बडोद्याचा पहिल्या मॅचमध्ये बंगालनं 4 विकेट्सनं पराभव केला होता. त्या मॅचमध्ये मुलीच्या निधनामुळे विष्णू खेळू शकला नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या