JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ACC Men's Emerging Cup: तुळजापूरच्या पोराचा धमाका, भारताने पाकिस्तानला धुतलं

ACC Men's Emerging Cup: तुळजापूरच्या पोराचा धमाका, भारताने पाकिस्तानला धुतलं

एसीसी मेन्स इमर्जिंग कपचा 12वा सामना भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात कोलंबोमध्ये खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय टीमचा 13 ओव्हर शिल्लक राहून 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

जाहिरात

राजवर्धन हंगर्गेकरने पाकिस्तानला लोळवलं

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : एसीसी मेन्स इमर्जिंग कपचा 12वा सामना भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात कोलंबोमध्ये खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय टीमचा 13 ओव्हर शिल्लक राहून 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. भारतीय टीमच्या बॉलिंगवेळी तुळजापूरच्या राजवर्धन हंगर्गेकरने धमाका केला, यानंतर साई सुदर्शनने बॅटने कमाल केली. याशिवाय निकिन जोसला अर्धशतक करण्यात यश आलं. यामुळे पाकिस्तानने दिलेलं 206 रनचं आव्हान भारताने 36.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. साई सुदर्शनने ओपनिंगला येत 110 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 104 रनची नाबाद खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या निकिन जोसने 64 बॉलमध्ये 7 फोरच्या मदतीने 53 रन केल्या. याशिवाय अभिषेक शर्माने 28 बॉलमध्ये 20 आणि कर्णधार यश धूलने 19 बॉलमध्ये 21 रनची खेळी केली. Asia Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीखही ठरली पहिले बॉलिंग करताना राजवर्धन हंगर्गेकरने पाकिस्तानला एकामागोमाग एक धक्केदिले. राजवर्धनने 8 ओव्हरमध्ये 5.25 च्या इकोनॉमी रेटने 42 रन देऊन 5 विकेट घेतल्या. हंगर्गेकरनेने सईम अयूब, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मोहम्मद वसीम आणि शाहनवाज दहानी यांच्या विकेट घेतल्या. हंगर्गेकरशिवाय मानव सुतारने 3, रियान पराग आणि निशांत सिंधू यांनी एक-एक विकेट मिळवली. कोलंबोमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचा 48 ओव्हरमध्ये 205 रनवर ऑलआऊट झाला. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कासिम अक्रमने 63 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीने 48 रन केल्या. पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहानने 36 बॉलमध्ये आठ फोर मारत 35 रन केले. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मुबासिर खानने 38 बॉलमध्ये 28 आणि चौथ्या क्रमांकाच्या हसीबुल्लाह खानने 55 बॉलमध्ये 27 रन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या