JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / डीव्हिलियर्स करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन, 2 टीममध्ये मिळणार खास भूमिका!

डीव्हिलियर्स करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन, 2 टीममध्ये मिळणार खास भूमिका!

आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) डीव्हिलियर्सचं 360 वादळ मैदानात दिसणार नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स निराश झालेल्या फॅन्सना एक आनंदाची बातमी आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सनं  (AB de Villiers) मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेली काही वर्ष डीव्हिलियर्स फक्त आयपीएलमध्ये खेळत होता. आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) डीव्हिलियर्सचं 360 वादळ मैदानात दिसणार नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स निराश झालेल्या फॅन्सना एक आनंदाची बातमी आहे. डीव्हिलियर्स क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. डीव्हिलियर्सनं ‘टाईम्स लाईव्ह’ शी बोलताना सांगितले की, ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट आणि आरसीबीमध्ये माझ्यासाठी खास भूमिका असेल, अशी मला आशा आहे. मी काही खेळाडूंचं तरी आयुष्य बदलू शकतो, हे भविष्यात अनुभवण्याची संधी मला मिळेल. हे कायमस्वरूपी असेल की हंगामी हे मला माहिती नाही. वेळ आल्यावर त्याबाबतचा निर्णय घेईन.’ कोरोना महामारीच्या काळात क्रिकेट खेळणे आव्हानात्मक होते, असे डीव्हिलियर्सने मान्य केले. ‘आयपीएल स्पर्धेसाठी दोन वेळा जाणे, इतके सर्व निर्बंध, कोरोना तपासणी, विमान रद्द होणे किंवा सुटणे, मुलांच्या शाळेची व्यवस्था करणे हे सर्व आव्हानात्मक होते. या काळात काम करणे अवघड होते. मी नेहमीच खेळाचा आनंद घेतला आहे. तो आनंद जेव्हा कमी होऊ लागला त्यावेळी आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे मला लक्षात आले,’ असे डीव्हिलियर्सने या मुलाखतीमध्ये सांगितले. IND vs SA : आऊट होताच राहुल झाला नाराज, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घातला वाद! VIDEO RCB मध्ये होणार पुनरागमन आरसीबीचे हेड कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी यापूर्वीच डीव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कॅम्पमध्ये परत येईल असे संकेत दिले आहेत. ‘डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूनं बॅटींग कोच म्हणून काम केले तर ते खेळाडूंच्या फायद्याचे ठरेल. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे,‘असे बांगरने यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. संजय बांगर यापूर्वी टीम इंडियाचे बॅटींग कोच होते. ते आता पुढील सिझनमध्ये आरसीबीचे हेड कोच असतील. ‘हेड कोचला बॅटींग आणि बॉलिंगसह टीमच्या एकूण प्लॅनिंगवर लक्ष द्यावं लागतं. त्याच्याकडे वेळ कमी असतो. बॅटींग कोच हा बॅटर्सना चुका दाखवण्याचे तसेच योग्य प्रशिक्षण देण्याचे काम करतो,’  असे बांगरने यावेळी स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ डीव्हिलियर्सनं देखील आरसीबीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानं आगामी आयपीएल सिझनमध्ये तो नव्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या