JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ड्वेन ब्राव्होसमोर आली होती अश्विन स्टाईल आऊट करण्याची संधी, पण...VIDEO

ड्वेन ब्राव्होसमोर आली होती अश्विन स्टाईल आऊट करण्याची संधी, पण...VIDEO

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होचा (Dwayne Bravo) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: वेस्ट इंडिजमध्ये सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक खेळाडू पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021) तयारी करत आहेत. मुंबई इंडियन्स कायरन पोलार्डनं (Kieron Pollard),  कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल (Andre Russell) यांनी आक्रमक खेळी करत आयपीएलसाठी आपण सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. आता त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) देखील चर्चेत आला आहे. गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हीस पेट्रीओट्स या सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात गयानाची इनिंग सुरु असताना ब्राव्हो बॉलिंग करत होता. ब्राव्होनं बॉल टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर एंडला असलेला मोहम्मद हाफिज क्रिझ सोडून पुढे गेला होता. ब्राव्होनं हाफीजला पुढं गेल्याचं पाहिलं. तो बॉलिंग करताना थांबला पण त्यानं हाफीजला मंकड आऊट (Mankad Out) केलं नाही. त्यानं हाफीजची गळाभेट घेत त्याच्या चुकीची त्याला जाणीव करुन दिली.

संबंधित बातम्या

IND vs ENG: लीड्समधील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, दिग्गज खेळाडूला दुखापत ब्राव्होच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या कृतीबद्दल त्याची प्रशंसा केली आहे. यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये (IPL 20219) तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेल्या आर. अश्विननं (R. Ashwin) राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला (Jos Buttler) कोणताही इशारा न देता आऊट केले होते. त्या प्रकरणाचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या