मुंबई, 03 एप्रिल : जगभर पसरलेल्या कोरोनाने आता भारतातही धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी लॉकाडउन करण्यात आलं. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना मदतीची गरज आहे. या परिस्थितीत काही संस्था, व्यक्ती अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. असाच एक मदतीचा व्हिडिओ भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने शेअर केला आहे. एक शिख बांधव वृद्ध महिलेला मदत करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हरभजन सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या घरात जाऊन व्यक्ती तिला काही साहित्य देतो. त्यावेळी महिलेच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यानंतर संबंधित व्यक्ती महिलेला पैशांची मदतही देऊ करतो आणि तिथून निघतो. हरभजन सिंगने ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअऱ केला आहे. व्हिडिओ शेअर करताना हरभजनने म्हटलं की, आपण सर्वजण मिळून कोरोना व्हायरसशी लढा देऊ शकतो. तसंच मदत करणाऱ्या या व्यक्ती देवदूतच असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. हरभजनने मदत करणाऱ्यांचं कौतुकही केलं आहे.
हरभजन सिंगने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या एनजीओला फंड मिळावा म्हणून व्हिडिओतून आवाहन केलं होतं. त्याच्यानंतर युवराज सिंगनेही अपील केलं होतं. मात्र दोघांच्याही या आवाहनानंतर भारतीय चाहत्यांनी दोन्ही खेळाडूंना ट्रोल केलं होतं. हे वाचा : कोरोनाशी लढा : केंद्राने राज्यांना दिले 17287 कोटी, मिळणार SDRMF चा पहिला हप्ता