क्रिकेटचा देव असं समजलं जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची वार्षिक कमाई 9 अब्ज रुपये इतकी आहे. कोरोनाग्रस्तांसाठी सचिन उशिराच पुढे आला. त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत.
मुंबई, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसचा देशातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात जवळपास 6 हजाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून यातही झपाट्यानं वाढ होत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने 50 लाख रुपयांची मदत केली आहे. कोरोनाच्या लढाईसाठी मदत केल्यानंतर सचिननं ट्वीट करून इतरांनाही यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. सचिनने केलेल्या मदतीबद्दल अपनालय या खासगी संस्थेनं ट्विट केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं आहे. अपनलय संस्थेनंसुद्धा ट्विट केलं की,“मदतीबद्दल सचिन तेंडुलकरचे आभार” लॉकडाऊनच्या काळात ज्यांची गैरसोय झाली आहे. अशा लोकांना अपनालय मदत करत आहे. या खासगी संस्थेनं एका महिन्यात जवळपास 5000 लोकांना रेशन देण्याची जबाबदारी घेतली आहे. सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, संस्था जे काम करत आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा. त्याचं काम असंच सुरू राहावं.
आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी मदत केली आहे. यामध्ये इरफान पठाण, यूसुफ पठाण, सौरव गांगुली यांनीही मदत केली आहे. सचिनने 50 लाख रुपये मदत दिल्यानंतर आता इतरांनाही मदतीसाठी प्रेरणा मिळेल. हे वाचा : चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, IPLचे आयोजन होणार; BCCIने तयार केला प्लॅन संपादन - सुरज यादव