टोकियो, 30 मार्च : कोरोना व्हायरसमुळे यंदा होणाऱी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं आहे. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. टोकियो 2020 चे प्रमुख योशिरो मोरी यांनी अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषेदत याची घोषणा केली. मोरी यांनी ही घोषणा करण्याआधी काही तासांपूर्वी सांगितलं होतं की, आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या आठवड्यात नव्या तारखांबाबत निर्णय घेईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 24 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान होणार होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही एक वर्षभर ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आलं. आयओसी आणि जपान सरकार सातत्यानं सांगत होते की, ठरलेल्या वेळेतच ऑलिम्पिक होईल पण कोरोना वाढतच असल्यानं क्रीडा महासंघ आणि खेळाडुंच्या दबावापुढे त्यांना नमतं घ्यावं लागलं. ऑलिम्पिक काही महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यावेळी युरोपीय फुटबॉल आणि उत्तर अमेरिकन खेळाच्या लीगचे आयोजन केलेलं असतं. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी आणि सीईओ तोशिरो मुतो यांनी सांगितलं होतं की, नव्या तारखांवर खेळांचे आयोजन करण्यास खूप खर्च येईल. हा खर्च अब्जावधी डॉलर्समध्ये असू शकतो. या सगळ्या खर्चाचा भार जपानच्या करदात्यांवर पडणार आहे. सध्या यासाठी 12.5 अब्ज डॉलर खर्च येईल असं सांगण्यात येत आहे. मात्र यापेक्षा दुप्पट रक्कम लागू शकते. हे वाचा : IPL 2020 होणार रद्द, पुढच्या वर्षी होणार नाही दिग्गज खेळाडूंचा लिलाव-रिपोर्ट स्पर्धा पुढे ढकलण्याच्या करण्याच्या निर्णयामुले हॉटेल, तिकिट, व्हेन्यू, वाहतूक या सर्वांवर परिणाम झाला आहे. जपानच्या सरकारने स्पर्धेला रिकव्हरी ऑलिम्पिक म्हटलं होतं. त्याच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं की, 2011 मध्ये आलेल्या त्सुनामी, भूकंप आणि फुकुशिमाच्या संकटांना झेलल्यानंतरही स्पर्धेचं आयोजन करू शकतो. आता खेळांना कोरोना व्हायरसवर मानवाने मिळवलेला विजय अशा स्वरुपात दाखवलं जाईल. हे वाचा : 800 कोटींचा मालक असलेल्या धोनीचं एक स्वप्न, क्रिकेटमधून 30 लाख कमवायचे आणि…