JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy फायनलमध्ये फलंदाजीवेळी बिघडली पुजाराची तब्येत, सामना अर्ध्यातच थांबवला

Ranji Trophy फायनलमध्ये फलंदाजीवेळी बिघडली पुजाराची तब्येत, सामना अर्ध्यातच थांबवला

सौराष्ट्रकडून खेळणारा चेतेश्वर पुजाराला फलंदाजी करताना अस्वस्थ वाटू लागल्यानं रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर सामना पुढे न खेळवता तिथंच थांबवण्यात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 मार्च : भारताचा कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात सौराष्ट्रकडून खेळत आहे. सोमवारी चेतेश्वर पुजारा बंगालविरुद्ध खेळण्यासाठी उतरला पण अचानक तब्येत बिघडल्यानं त्यानं अर्ध्यातच मैदान सोडलं. रिटायर्ड हर्ट होऊन पुजारा मैदानाबाहेर गेला. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादडकटनं फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिली विकेट पडल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानावर न आल्यानं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील सामना सुरु झाल्यानंतर सौराष्ट्रचा पहिला गडी बाद झाला. त्यानंर प्रकृती ठिक नसल्यानं पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला नव्हता. पुजाराचा अंतिम सामन्यासाठी सौराष्ट्रच्या संघात समावेश करण्यात आला आहे. पुजारने पहिल्या दिवशी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला त्याचं कारण बिघडलेली तब्येत हे होत. नेहमी तिसऱ्या क्रमांकावर पुजारा लवकर फलंदाजीला आला नाही तेव्हाच आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. सहाव्या क्रमांकावर पुजारा आला पण त्यानं फक्त 24 चेंडूत खेळले आणि त्यात 5 धावा केल्या. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं पुजाराने पंचांना माहिती दिली. त्यानंतर पुजारा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर आला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्रने 5  बाद 206 धावा केल्या होत्या. पुजाराची तब्येत बिघडल्यानं तो रिटायर्ड हर्ट झाला आणि सामना थांबवण्याचा निर्णय गेतला गेला. सेमीफायनलमध्ये गुजरातविरुद्ध नाबाद शतक झळकावणाऱा अर्पित वसावडा 29 धावांवर नाबाद राहिला. हे वाचा : लग्नाची बेडी खेळाडूला पडणार महागात, कायद्याच्या उल्लंघनामुळे होणार तुरुंगवास?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या