chetan sharma
मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. चेतन शर्मा त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे संघ निवडीच्या मुद्द्यांवर बोलताना दिसत आहेत. चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादावरही बरंचसं वक्तव्य केलं आहे. या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा वादात अडकले असून बीसीसीआय लवकरच त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. बीसीसीआयकडून चेतन शर्मांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देऊ शकते, त्यानंतर पुढच्या कारवाईवर निर्णय होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघाची घोषणा होण्याआधी त्यांना पुढच्या निवड समितीच्या बैठकीत बीसीसीकडून चेतन शर्मांना सहभागी होण्याची संधी दिली जाईल की नाही. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्याने चेतन शर्मांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसंच याचा भारतीय संघ आणि सिलेक्टर्स यांच्यातील संबंधावर वाईट परिणाम होऊ शकतो. हेही वाचा : दिप्ती शर्माने भुवी, चहलला टाकले मागे; टी20 मध्ये केला खास विक्रम बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआय़शी बोलताना सांगितले की, या स्टिंग ऑपरेशननंतर कोणताही खेळाडू किंवा निवड समितीचा सदस्य सर्वच पत्रकारांशी सहज संवाद साधू शकणार नाही. चेतन शर्मा थोडं जास्तीच बोलले. भारतातील कोणताही वरिष्ठ खेळाडू त्यांच्याशी बोलत नाही. जेव्हा बीसीसीआयच्या सूत्रांना विचारण्यात आले की, चेतन यांना कोणत्याही सराव सत्रात जाहीरपणे राहुल द्रविड किंवा विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याशी बोलताना पाहिलं आहे का? त्यावर सूत्रांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात टी२० वर्ल्ड कपवेळी ते एका कोपऱ्यात उभे रहायचे आणि कोणाशीही बोलण्याचं त्यांनी कष्ट घेतलं नाही.
चेतन शर्माने आरोप केला आहे की, ८० ते ८५ टक्के खेळाडू फिट असतानाही संघात कायम राहण्यासाठी इंजेक्शन घेतात. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२- मालिकेत बुमराहच्या पुनरागमनावरून त्यांच्यात आणि संघ व्यवस्थापनात वाद झाला होता. बुमराह ती मालिका खेळण्यासाठी फिट नव्हता तरी खेळला होता.