JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / काहे दिया 'कमेंट', सायलीच्या फोटोवर ऋतुराज घायाळ, चर्चा तर होणारच!

काहे दिया 'कमेंट', सायलीच्या फोटोवर ऋतुराज घायाळ, चर्चा तर होणारच!

सायलीने (Sayali Sanjeev) नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केले आहेत. त्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स तसेच लाइक्सही दिले आहे. पण यातील सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी कमेंट होती ती क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याची.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 मे : सध्या आयपीएलचं (IPL 2021) वातावरण थंड झालं आहे. बीसीसीआयने (BCCI) सध्या सुरू असलेलेल्या सगळ्या आयपीएल मॅचेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण सध्या चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू (CSK player) ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या कमेंट गेमची. काही दिवसांपूर्वी सायलीने ऋतुराजच्या फोटोवर कमेंट करून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे सायली चांगलीच चर्चेत आली आहे. सायलीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केले आहेत. त्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स तसेच लाइक्सही दिले आहे. पण यातील सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी कमेंट होती ती क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याची. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर “Woahh” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सायली आणि ऋतुराज या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

सायलीने केलेली कमेंट ही हार्ट इमोजी अशी होती. तेव्हा आता हा कमेंट्सचा खेळ नक्की काय आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

‘काहे दिया परदेस’ (Kahe diya pardes) या मालिकेतून सायलीने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होत. या मालिकेनंतर ती प्रकाशझोतात आली होती. सध्या ती कलर्स मराठी (Colors Marathi) वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ (Shubhamangal Online) या मालिकेत काम करत आहे. सुयश टिळक सोबतची तिची जोडी लोकप्रिय ठरत आहे. याशिवाय लवकरच ती ‘झिम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर लाँच झाला आहे. तर या चित्रपटात ती बोल्ड अवतारात दिसून येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या