नवी दिल्ली, 22 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम हार्परला एका सामन्यावेळी धावबाद होण्यापासून वाचण्याची खटपट महागात पडली. बिग बॅश लीगमधील एका सामन्यात धावबाद होऊ नये यासाठी त्याने गोलंदाजाच्या वरून उडी मारली. मात्र, उंचावरून खाली पडताना त्याच्या डोक्याला मार लागला. मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यावेळी हा प्रकार घडला. रेनेगेड्सला हा सामना चार धावांनी गमवावा लागला. होबार्ट हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मैदानात उतरलेल्या रेनेगेड्सच्या डावाच्या चौथ्या षटकात हार्परला दुखापत झाली. नाथन एलिसच्या चेंडूवर धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी सॅम हार्परने नॉन स्ट्राइकला उभा असलेल्या एलिसच्या अंगावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तोल गेल्यानं तो जमिनीवर आपटला. यावेळी डोक्याला दुखापत झाल्यानं हार्परला मैदान सोडावं लागलं.
एलिसने टाकलेला चेंडू हार्परने टोलावला. त्यानंतर एकेरी धाव घेण्यासाठी धावला. एलिस हार्परला धावबाद करण्याच्या तयारीत होता. तेव्हा हार्पर वाचण्यासाठी एलिसशी जाऊन भिडला. हार्पर वेगाने खेळपट्टीवर येत होता तेव्हा एलिस त्याच्या वाटेत आडवा आला होता. तेव्हा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात उडी मारल्यानंतर हार्परचा तोल सुटला आणि तो जमिनीवर पडला. तत्पूर्वी, हरिकेन्सने मॅथ्यू वेड आणि मॅकलिस्टर राइट यांच्या अर्धशतकांच्या जोरावर तीन बाद 190 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना रेनेगेड्सला 4 बाद 186 धावांपर्यंत मजल मारता आली. रेनेगेड्सकडून शॉन मार्श, ब्यू वेबस्टर आणि मोहम्मद नबी यांनी अर्धशतक केलं. हार्परला 6 धावांवरच रिटायर्ड हर्ट होऊन परतावं लागलं. ‘धोनीच्या वेळी असं होत नव्हतं’, विराट कोहलीवर भडकला सेहवाग