JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Happy Birthday Bhuvneshwar Kumar: फक्त या एका माणसाने सचिन तेंडुलकरला केलं होतं शून्यावर गारद!

Happy Birthday Bhuvneshwar Kumar: फक्त या एका माणसाने सचिन तेंडुलकरला केलं होतं शून्यावर गारद!

सचिन तेंडुलकरच्या (Sachin tendulkar) एका ट्वीटची सध्या जोरदार चर्चा असली, तरी त्याला शून्यावर बाद करण्याचा पराक्रम करणाऱ्या या गोलंदाजाची गोष्ट आज ऐका. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचा आज 31 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने

0108

सचिन तेंडूलकर हा आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्वीट वर कमेंट केल्या पासून खूप चर्चेत आहे. काही लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय तर काही जणांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. पण आज आपण सचिन बद्दल नाही तर दुसऱ्याच एका खास क्रिकेटर बद्दल बोलणार आहोत ज्याचा आज जन्मदिवस आहे.

जाहिरात
0208

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव मानला जातो पण भुवनेश्वर कुमार हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने सचिनला रणजी ट्रॉफीमध्ये शून्यावर बाद केले होते. अश्या भुवनेश्वर कुमार उर्फ 'भूवी' चा आज बर्थडे!

जाहिरात
0308

भुवनेश्वर कुमारचा जन्म मेरठमध्ये, 5 फेब्रुवारी 1990 रोजी झाला. उत्तर प्रदेशमधील ह्या दर्जेदार गोलंदाजाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आपल्या राज्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्यास सुरुवात केली.

जाहिरात
0408

भुवीने भारताकडून खेळताना एकामागून एक अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामन्यात 63 बळी घेतले आहेत.

जाहिरात
0508

याशिवाय त्याने 114 एकदिवसीय सामन्यात 132 बळी, 43 टी -20 मध्ये 41 बळी आणि 121 IPL सामन्यात 136 बळी मिळवले आहेत.

जाहिरात
0608

2014 मध्ये भारत जेव्हा इंग्लंड दौर्‍यावर होता तेव्हा भुवनेश्वरने 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तीन अर्धशतक ठोकले होते. कसोटी मालिकेदरम्यान नवव्या स्थानी खेळताना तीन अर्धशतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

जाहिरात
0708

त्याचबरोबर आयपीएलमध्येही 2016 आणि 2017 ही दोन वर्षे सर्वात जास्त विकेट घेऊन सलग पर्पल कैप मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटूही आहे.

जाहिरात
0808

एकदिवसीय, टी -२० आणि कसोटी क्रिकेट या तिन्ही स्वरूपात पाच बळी घेणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या