JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Eng: धोनीच्या बालेकिल्ल्यात बेन फोक्सची जादू, स्टम्पिंगनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Ind vs Eng: धोनीच्या बालेकिल्ल्यात बेन फोक्सची जादू, स्टम्पिंगनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

आज खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच काही मिनिटांमध्ये चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या विकेट टीम इंडियाने गमावल्या. या तिघांचीही विकेट घेण्यात बॉलरपेक्षा इंग्लंडचा विकेटकिपर बेन फॉक्स(Ben Foakes) याचं योगदान सर्वात जास्त होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लड (Ind vs Eng) दरम्यान सध्या चेन्नईमध्ये दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात मात्र भारतासाठी चांगली झालेली नाही. आज खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच काही मिनिटांमध्ये चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या विकेट टीम इंडियाने गमावल्या. यामुळं इंडियन टीम बॅक फूटवर गेली असून सध्या भारताकडं 380 हून अधिक धावांची आघाडी झाली आहे. पण या सगळ्यात या तिघांचीही विकेट घेण्यात बॉलरपेक्षा इंग्लंडचा विकेटकिपर बेन फॉक्स(Ben Foakes) याचं योगदान सर्वात जास्त होतं. त्यानं केलेल्या स्टम्पिंगमुळं सर्वांना महेंद्रसिंग धोनीची(MS Dhoni) आठवण झाली. आजच्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा इंडियन टीमने चेतेश्वर पुजाऱ्याच्या रूपात पहिली विकेट गमावली. पुजाराने मारलेला बॉल फिल्डर ओलीपोपच्या हातात गेल्यानंतर त्यानं चपळाईने बॉल बेन फॉक्सकडे फेकला. फोक्सने तात्काळ स्टॅम्पिंग करत पुजाराला आऊट केलं. त्यानंतर चित्याच्या चपळाईने त्यानं रोहित शर्मा(Rohit sharma) यालादेखील स्टम्पिंग करत आऊट केलं. यामुळं त्यानं सर्वांना धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करून दिली. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या रिषभ पंतलादेखील (Rishabh Pant) त्यानं स्टम्पिंग करत आऊट केलं. पहिल्या इनिंगमध्ये शानदार खेळ करणारा रिषभ यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. त्यामुळं या इनिंगमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, पहिल्या इनिंगमध्येदेखील फोक्सने अक्षर पटेल(Akshar Patel) याला याच पद्धतीनं आऊट केलं होतं. मोईन अलीच्या(Moeen Ali) बॉलिंगवर त्यानं शानदार विकेट किपिंग करत आऊट केलं होतं. या मॅचमध्ये भारतीय संघानं चांगली पकड मिळवली असून सध्या इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन(Ravi Ashwin) बॅटिंग करत आहेत. त्यामुळं मोठी आघाडी घेत इंग्लंडला मोठं लक्ष देण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या