JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : असं कोण आऊट होतं? पुढे जाऊन खेळण्याच्या नादात पाय घसरला, मागे पाहिलं तर...

VIDEO : असं कोण आऊट होतं? पुढे जाऊन खेळण्याच्या नादात पाय घसरला, मागे पाहिलं तर...

क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला लहानशी चूकही महागात पडू शकते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात बेन फोक्सची एक चूक त्याला बाद करून गेली.

जाहिरात

ben foaks

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 26 फेब्रुवारी : क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला लहानशी चूकही महागात पडू शकते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात बेन फोक्सची एक चूक त्याला बाद करून गेली. पुढे येऊन चेंडू मारायचा प्रयत्न करताना बेन फोक्स अडखळला आणि पडला. त्यानंतर त्याने पाय क्रीजमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पण थोडक्यात त्याला अपयश आले आणि तो बाद झाला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू मायकल ब्रेसवेलने टाकलेला चेंडू बेन फोक्स पुढे येऊन मारायला गेला. तेव्हा फटका चुकला आणि चेंडू यष्टीरक्षक टॉम ब्लंडलच्या हातात गेला. त्याचवेळी पुढे गेलेला बेन फोक्स अडखळून खेळपट्टीवर पडला. हीच संधी साधत टॉम ब्लंडलने बेनला यष्टीचित केलं. बेन फोक्स शून्यावर बाद झाला. IPL2023 : एमएस धोनीपेक्षा केएल राहुलची सॅलरी आहे जास्त, रोहित-पांड्याला किती?

संबंधित बातम्या

मायकल ब्रेसवेलच्या ज्या चेंडूवर बेन फोक्स बाद झाला तो लेग स्टम्पच्या लाइममध्ये होता. खेळपट्टीवर पडताच चेंडू बाहेरच्या बाजूला वळला. यावर चेंडू खेळण्यासाठी बेन फोक्स थोडा पुढे आला आणि त्याचा पाय घसरून खेळपट्टीवर पडला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत टॉम ब्लंडलने बेल्स उडवल्या. बेन फोक्सला खातंही उघडता आलं नसलं तरी इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या. हॅरी ब्रूकच्या १८६ धावा आणि जो रूटने नाबाद १५३ धावा केल्या. या जोरावर इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ४३५ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने पहिल्या डावात ३ बाद २०० धावांपर्यंत मजल मारली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या