JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs BAN: पहिला दिवस- बांगलादेशचे लोटांगण; टीम इंडिया मजबूत स्थितीत!

IND vs BAN: पहिला दिवस- बांगलादेशचे लोटांगण; टीम इंडिया मजबूत स्थितीत!

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 14 नोव्हेंबर: बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत आहे. सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी बांगलादेशचा डाव 150 धावात संपुष्ठात आला. त्यानंतर दिवस अखेर भारताने एक बाद 86 धावा केल्या. भारत अद्याप 64 धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अग्रवाल 37 (नाबाद) आणि चेतेश्वर पुजारा 43(नाबाद) खेळत होते. भारतीय संघाने केवळ रोहित शर्माच्या रुपाने एकच गडी गमावला. रोहित केवळ 6 धावा करुन बाद झाला. त्याआधी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक याचा हा निर्णय अंगलट आला. उमेश यादवने इम्रूल कायेस 6 धावांवर बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशांत शर्माने शदमान इस्लामची बाद करत दुसरी विकेट घेतली. सलामीची जोडी बाद झाली तेव्हा बांगलादेशची अवस्था 2 बाद 12 अशी होती. लंचपर्यंत बांगलादेशची अवस्था 3 बाद 63 होती. दुसऱ्या सत्रात मुस्ताफिझूर रेहमान वगळता बांगालादेशच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. अश्विनने मधल्या फळीतील विकेट घेत बांगलादेशला कमबॅकची संधीच दिली नाही. त्यानंतर शमी, यादव आणि शर्मा यांनी तळातील फलंदाजांना बाद केले. भारताकडून शमीने 3, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

संबंधित बातम्या

संघ- भारत (अंतिम १२) : रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, कुलदीप यादव. बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), इम्रूल कायेस, मुशफिकूर रहिम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला रियाद, मोहम्मद मिथुन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, मुस्ताफिझूर रेहमान, नईम, हसन, सैफ हसन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, ईबादूत हुसैन, अल अमिन हुसैन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या