tamim iqbal
ढाका, 03 मार्च : बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबालने एक डीआरएसचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पंचांनी दिलेला निर्णय बदलण्यासाठी तमीम इकबालने डीआरएस घेतला पण त्यावरून आता तमीमची खिल्ली उडवली जात आहे. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना टस्कीन अहमद ४७ वे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील अखेरचा चेंडू एक यॉर्कर होता. हा चेंडू आदिल राशिदने बॅटने ब्लॉक केला. चेंडू बॅटवर लागला तरी तमीमने डीआरएसचा निर्णय घेतला. हा चेंडू बॅटच्या मधे लागला होता. पॅडच्या जवळपासही नव्हता, तरीसुद्धा डीआरएस घेतल्यानं क्रिकेट प्रेमींच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. VIDEO : अश्विनचा माइंड गेम, ऑस्ट्रेलियन फलंदाज वैतागला; हिटमॅनने काय केलं पाहा
सोशल मीडियावर डीआरएसचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालला ट्रोल केलं जात आहे.
इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद ३२६ धावा केल्या. या जेसन रॉयने १२४ चेंडूत १३२ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ७६ धावांची खेळी केली.