JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आई सर्व काही करते! डॉक्टर आईनं मुलीच्या खेळासाठी सोडले करिअर, वाचा इतिहास घडवणाऱ्या फुलराणीची भावुक स्टोरी

आई सर्व काही करते! डॉक्टर आईनं मुलीच्या खेळासाठी सोडले करिअर, वाचा इतिहास घडवणाऱ्या फुलराणीची भावुक स्टोरी

इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या 20 वर्षीय मालविका बनसोडेने भारताची पहिली फुलराणी सायना नेहवालचा पराभव करत नवा इतिहास रचला.

जाहिरात

Malvika Bansod

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जानेवारी: बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला(Saina Nehwal) दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने (Malvika Bansod) इतिहास रचला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या 20 वर्षीय मालविका बनसोडने सायनाचा पराभव केला. विशेष म्हणजे मालविकाच्या या ऐतिहासिक विजयात तिची आई डॉ. तृप्ती बनसोड यांचे मोठे योगदान आहे. मुळची नागपूरच्या असणाऱ्या मालविका बनसोडने इंडियन ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला आहे. सायनाने 2010 मध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिला पराभूत करणारी मालविका दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. मालविकाने सायनाला 21-17 आणि 21-09 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. जागतिक क्रमावारीत सायना 25 व्या तर मालविका 111 व्या क्रमांकावर आहे.

आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे हे फळ

मालविकाच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये आई डॉ. तृप्ती बनसोड यांचा त्याग आणि प्रशिक्षक संजय मिश्रा यांच्या प्रशिक्षणाचे मोठे योगदान आहे. डेंटिस्ट डॉ. तृप्ती यांनी मुलीच्या प्रशिक्षणासाठी फक्त घरच नव्हे तर डॉक्टरचा पेशाही सोडला. मुलीच्या सरावादरम्यान तृप्ती रोज 6 ते 9 तास बॅडमिंटन हॉलमध्ये बसतात. मुलीला खेळात मदत करण्यासाठी तृप्ती यांनी डेंटिस्टचे (बीडीएस) शिक्षण घेतल्यानंतर स्पोर्ट‌्स सायन्समध्ये मास्टर्सची पदवी घेतली. मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोडही नागपूरमध्ये डेंटिस्ट आहेत. ‘मालविकाने कनिष्ठ गटात अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. या काळात संजय मिश्रा मालविकाचे प्रशिक्षक होते. तसेच, 2018 मध्ये सीनियर झाल्यानंतर मालविका त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ शकत नव्हती, कारण संजय हे रायपूरचे आहेत. तिच्या प्रशिक्षणासाठी मी 2016 मध्ये तिच्यासोबत रायपूरला शिफ्ट झाले. मालविकाने 2011 पासून बॅडमिंटन खेळणे सुरू केले. मी जास्तीत जास्त काळ तिच्यासोबत असते. माझ्या या त्यागामुळे मालविकाने देशाला पदक मिळवून दिले तर माझ्यासाठी त्यापेक्षा मोठे काहीही असणार नाही.’ अशी भावना व्यक्त करत आई तृप्ती यांनी क्वार्टर फायनलमध्ये मालविकाची लढत आकर्षी कश्यपशी होणार असल्याची माहिती दिली. याआधी 2017 मध्ये पी. व्ही. सिंधूने सायनाला पराभूत केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या