JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑस्ट्रेलियन PM अहमदाबादमध्ये खेळणार होळी, PM मोदींसोबत पाहणार क्रिकेट मॅच

ऑस्ट्रेलियन PM अहमदाबादमध्ये खेळणार होळी, PM मोदींसोबत पाहणार क्रिकेट मॅच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल तर भारताला चौथी कसोटी जिंकावी लागेल. सामना अनिर्णित राहिला तरी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिंवत असतील.

जाहिरात

australia pm

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 8 मार्च : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज हे चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यामध्ये अल्बानीज अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीत असणार आहेत. २०१७ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात साबरमती आश्रमाशिवाय राजभवनातील होळीच्या कार्यक्रमातही सहभागी होती. तर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहतील. त्यानतंर अल्बानीज हे मुंबईला रवाना होतील. मुंबईत INS विक्रांतवर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. जागतिक महिला दिन विशेष: WPLमध्ये सर्वात महाग ठरलेल्या स्मृतीचा कसा आहे संघर्षमय प्रवास? जाणून घ्या   भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत चार कसोटी सामन्यांपैकी तीन कसोटी सामने झाले आहेत. यात भारत २-१ ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल तर भारताला चौथी कसोटी जिंकावी लागेल. सामना अनिर्णित राहिला तरी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिंवत असतील. पण इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात चुरस सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या