JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्वत:ची बर्थ डे पार्टी पडली महागात! ऑलिम्पिक चॅम्पियन उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह

स्वत:ची बर्थ डे पार्टी पडली महागात! ऑलिम्पिक चॅम्पियन उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह

बोल्टनं स्वत: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे व्हिडीओ पोस्ट करून सांगितले. 21 ऑगस्ट रोजी बोल्टनं वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगच्या प्रोटोकॉलचे पालन केले नव्हते.

जाहिरात

दुसरीकडे बोल्टनं 21 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगच्या प्रोटोकॉलचे पालन केले नव्हते. बोल्टने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत, 'मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. शनिवारी माझी चाचणी करण्यात आली. मी सध्या आयसोलेशनमध्ये राहत आहे', अशी माहिती दिली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

किंग्सटन, 25 ऑगस्ट : आठवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटू उसेन बोल्टला (Usain Bolt) कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोल्टने काही दिवसांपूर्वी जमैका येथे त्याच्या 34 व्या वाढदिवशी इंग्लिश फूटबॉलपटू रहीम स्टर्लिंगसह इतर पाहुण्यांसह मेजवानी केली होती. काही दिवसांपूर्वी उसेन बोल्टची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली होती. बोल्टनं स्वत: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे व्हिडीओ पोस्ट करून सांगितले. 21 ऑगस्ट रोजी बोल्टनं वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगच्या प्रोटोकॉलचे पालन केले नव्हते. बोल्टने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. शनिवारी माझी चाचणी करण्यात आली. मी सध्या आयसोलेशनमध्ये राहत आहे’. जमैका रेडिओ स्टेशन ‘नॅशनवाइड90 एफएमने बोल्ट पॉझिटिव्ह असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करत त्यानं स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवल्याचे सांगितले. आता बोल्टच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. वाचा- दिलासादायक! 24 लाख भारतीयांनी कोरोनाला हरवलं, वाचा 24 तासांतील आकडेवारी

संबंधित बातम्या

वाचा- महाराष्ट्र Unlock करण्याची घाई करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत बोल्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रहीम स्टर्लिंगला मोठा धक्का बसला आहे. 25 वर्षांचा फॉरवर्ड रहिम स्टर्लिंग हा प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे जो प्रीमियर लीग क्लबमध्ये मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. वाचा- 73 दिवसात Corona Vaccine मिळण्याचा दावा खोटा! पुण्यातून आली मोठी बातमी 11 जागतिक आणि 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बोल्टने 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर रिलेमध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. ट्रॅकवर राज्य करणारा महान अ‍ॅथलीट बोल्ट यांचे 2017 मध्ये गोल्डन निरोप घेतला. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची 4 एक्स 100 मीटर रिले शर्यत मात्र पूर्ण करू शकला नाही, जखमी झाल्यामुळे तो शर्यतीतून बाहेर पडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या