21 मे : आयपीएल या स्पर्धेची सुरुवात झाली ती 2008 साली. आयपीएलला सुरूवातीपासूनच प्रचंड लोकप्रियता मिळाली. या स्पर्धेत जशी चौकार-षटकारांची आतषबाजी पहायला मिळाली तशीच फलंदाजांची झालेली दैनाही प्रेक्षकांनी अनुभवली. म्हणूनच 10व्या सीझनमध्येही आयपीएल आपली लोकप्रियता टिकवून आहे. या 10 सीझन्समध्ये अनेक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत विविध संघांनी विजेतेपदाला गवसणी घातलीय. पाहूयात आतापर्यंत कोणकोणत्या संघानी आपीएल चषकावर आपले नाव कोरलंय- वर्ष विजेता संघ 2008 राजस्थान रॉयल्स 2009 डेक्कन चार्जर्स हैद्राबाद 2010 चेन्नई सुपर किंग्स 2011 चेन्नई सुपर किंग्स 2012 कोलकत्ता नाईट रायडर्स 2013 मुंबई इंडियन्स 2014 कोलकत्ता नाईट रायडर्स 2015 मुंबई इंडियन्स 2016 सनरायझर्स हैद्राबाद आजची फायनलही क्रिकेटरसिकांसाठी एक मेजवानी ठरणारेय. कारण आज होणाऱ्या फायनलमध्ये मुंबई आणि पुणे यांसारखे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. मुंबईने याअगोदर दोनदा ही स्पर्धा जिंकलीय तर पुण्याच्या संघाने पहिल्यांदाच आयपील फायनलमध्ये धडक मारलीय. असं असलं तरीही पुण्याकडून मुंबईला कडवी झुंज दिली जाणार यात शंका नाही. म्हणूनच आज मुंबई तिसऱ्यांदा आयपील चषकावर आपलं नाव कोरणार की पुणे पहिलंवहिलं विजेतेपद पटकावणार, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.