ओठांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव
नवी दिल्ली, 10 मार्च : प्रत्येक माणसाचं खास असं व्यक्तिमत्त्व (Personality) असतं. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं आहे, हे ओळखणं तसं अवघड असतं. ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) व्यक्तीचा स्वभाव, त्यातले गुण-दोष, एकूण व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीची कुंडली आणि राशीवरून समजतं. हस्तसामुद्रिक शास्त्रात (Palmistry) मात्र व्यक्तीच्या हातावरच्या रेषा, चेहऱ्याची ठेवण, नाक, कान, डोळे, ओठ आणि हातापायांच्या बोटांचा आकार आदी गोष्टींवरून व्यक्तिमत्त्वाचा आणि भविष्यातल्या संभाव्य घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. माणसाच्या ओठांच्या आकारावरून (Shape of Lips) त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं, स्वभाव आणि भविष्य (Future) या गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे ओठांची ठेवण, आकार आणि रंगावरून संबंधित व्यक्तीचा स्वभाव, भविष्यातल्या संभाव्य घटनांचा वेध घेता येऊ शकतो. ज्या व्यक्तींचे ओठ सुंदर असतात, त्या व्यक्ती खूप नशीबवान असतात. अशा व्यक्तींना त्यांच्या जीवनात सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं. लाल रंगाचे ओठ (Red Lips) असलेल्या व्यक्ती रागीट स्वभावाच्या असतात. तसंच त्या निडर आणि साहसी असतात. कधीकधी या व्यक्ती चौकटीबाहेर जाऊन काम करतात. या व्यक्तींना स्वतःच्या ताकदीवर सर्व काही साध्य करण्याची हौस असते आणि त्या त्यात यशस्वीदेखील होतात. या व्यक्ती जितका पैसा कमावतात, तितका खर्चही करतात. कुंडलीत शनी ग्रहाची स्थिती प्रतिकूल असेल, तर अशा व्यक्ती फसवणुकीच्या माध्यमातून पैसा कमावण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. या व्यक्ती अभ्यासात खूप हुशार असतात. ज्या व्यक्तींचे ओठ खूप जाड आणि रुंद असतात, ते सहजपणे वादात अडकतात. त्यामुळे अनेकदा त्यांना अपमान सहन करावा लागतो. या व्यक्ती खूप जिद्दी असतात. ज्या व्यक्तींचे ओठ बाहेरच्या बाजूला झुकलेले असतात, त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. या व्यक्तींना दुसऱ्यांना मदत करायला आवडते. या व्यक्ती वाईट व्यसनात अडकण्याची शक्यता जास्त असते.
गुलाबी ओठ (Pink Lips) हे हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार शुभ मानले गेले आहेत. असे ओठ असणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान आणि चांगल्या मनाच्या असतात. या व्यक्तींना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सन्मान मिळतो. स्वभावाने दयाळु असलेल्या या व्यक्ती कायम दुसऱ्याला मदत करण्यासाठी तयार असतात. लहान आकाराचे ओठ (Small Lips) असलेल्या व्यक्तींना प्रदर्शन करण्याची हौस असते. या व्यक्तींकडे पैसा पुरेसा असतो; पण आहे त्यापेक्षा अधिक श्रीमंत असल्याचं ते दाखवतात. काही वेळा यांची स्थिती डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी होते. या वाईट सवयीमुळे बाकीची माणसं यांच्यापासून दुरावतात. अशा व्यक्ती हुशार आणि मेहनती असूनदेखील फारशी प्रगती करू शकत नाहीत, असं हस्तसामुद्रिक शास्त्र सांगतं. हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)