मुंबई, 18 फेब्रुवारी : आपलं स्वत:चं घर (Dream Home) असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र आता अनेकांचं घराचं हे स्वप्न महागणार आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या (Inflation) काळात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) आणि खाद्यतेलानंतर आता घर खरेदीसाठी आणखी खिसा मोकळा करावा लागणार आहे. देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती 3 ते 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सिमेंट, स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या शहरांमध्ये किमती वाढल्या आहेत. PropTiger.com ने आपल्या अहवालात म्हटले आहे की ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अॅन्युअल राऊंड-अप 2021 च्या अहवालात गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये अहमदाबाद आणि हैदराबादमधील घरांच्या किमती 7 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यानंतर बंगळुरूमध्ये 6 टक्के, पुण्यात 3 टक्के आणि मुंबईत 4 टक्के वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर, कोलकाता आणि चेन्नईमध्ये घरांच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. सोन्याला पुन्हा झळाळी; एक वर्षानंतर दर पुन्हा 50 हजार पार, महाग होण्यामागे आहेत ही दोन मोठी कारणं विक्रीत 13 टक्के वाढ या काळात देशातील या आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 13 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये या शहरांमध्ये एकूण 2,05,936 घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये विक्रीचा आकडा 1,82,639 होता. अहवालात असे म्हटले आहे की 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये नवीन पुरवठ्यातही मोठी वाढ झाली आहे आणि हा आकडा 75 टक्क्यांनी वाढून 1.22 लाख युनिट्सवरून 2.14 लाख युनिटवर पोहोचला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला चाप, दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढले या दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर सरकारी मदत आणि कमी व्याजदराचा परिणाम अहवालानुसार, कोरोना विषाणू महामारीनंतर सरकारच्या समर्थन उपाय, ग्राहकांची चांगली भावना आणि स्थिर किंमती यामुळे ही वाढ दिसून आली. Housing.com, Makaan.com आणि PropTiger.com चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ध्रुव अग्रवाल म्हणाले की, भारतातील रिअल इस्टेट मार्केटने (Real Estate Market) वेगाने पुनरागमन केले आहे. सरकारचा पाठिंबा आणि कमी व्याजदरामुळे या क्षेत्रातील गती अबाधित राहील. यावर्षीही रिअल इस्टेट बाजारात तेजी येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.