JOIN US
मराठी बातम्या / पुणे / ओडिसातून मावळात फिरण्यासाठी आला अन् खोल दरीत कोसळला; पण सुदैवाने झाडाच्या फांदीत अडकला अन्...

ओडिसातून मावळात फिरण्यासाठी आला अन् खोल दरीत कोसळला; पण सुदैवाने झाडाच्या फांदीत अडकला अन्...

देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. हरिश्चंद्रसोबतही असंच काहीसं घडलं. इतक्यात खोल दरीत कोसळल्यानंतर तो सुदैवाने एका झाडाला अडकला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गणेश दुडम, मावळ 21 एप्रिल : ट्रेकिंग करणं अनेकांना आवडतं. अनेक लोक यासाठी अगदी दुरून महाराष्ट्रात येतात. मात्र, ट्रेकिंग करताना अनेकदा काहीतरी विपरित घटनाही घडतात. अशीच एक घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. यात परराज्यातून मावळ तालुक्यातील खंडाळा येथे ट्रेकिंगसाठी येणं ट्रेकरच्या जीवावर बेतलं होतं. मात्र लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यु टीमने, खोपोलीतील अपघाताग्रस्तांच्या मदतीची संस्था आणि वन्यजीव मावळ रेस्क्यू टीमने मंकी पॉईंट अंधारमय गर्द झाडीतील खोल दरीत पडलेल्या युवकाचे प्राण वाचविले.

प्रयत्नांची पराकाष्ठा करून हरिश्चंद्र मंडोल या ओरिसा राज्यातून आलेल्या ट्रेकर पर्यटकाला जीवदान देण्यात आलं. गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्टवरती काम करणारा हरिश्चंद्र निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यातील खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र रस्ता चुकला आणि अंधार झाल्याने त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो खोल दरीमध्ये पडला. मात्र देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. हरिश्चंद्रसोबतही असंच काहीसं घडलं. इतक्यात खोल दरीत कोसळल्यानंतर तो सुदैवाने एका झाडाला अडकला. तो ज्या रिक्षामधून घाटात फिरण्यासाठी आला होता त्या रिक्षा चालकाशी हरिश्चंद्रने लगेचच संपर्क साधला आणि आपल्याला मदतीची गरज आहे, असं सांगितलं. रिक्षा चालकाने लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला याची खबर दिली. शिवदुर्गचे कॅप्टन सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्य जीवरक्षक मावळ आणि खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्या युवकाला सुखरूप बाहेर काढून लोणावळा पोलिसांच्या स्वाधीन केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या