चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी मुंबई, 10 एप्रिल : भाजपचे नेते आणि राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना मातृशोक झाला आहे. विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांचं निधन झालं आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजाराने त्रस्त होत्या. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 09 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचं भाजपकडून राज्यभरात आयोजन केलं आहे. आज पुण्यात विनोद तावडे हे सावरकर यात्रेत सहभागी होते. सावरकर यात्रेचा समारोपाच्या वेळी तावडे हजर होते. त्याचवेळी आई विजया तावडे यांच्या निधनाची बातमी आली. आईच्या निधनाची बातमी कळताच विनोद तावडे हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहे.