JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Ravindra Mahajani: महाजनी यांच्या शेवटच्या दिवसात काय घडलं? शेजाऱ्यांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Ravindra Mahajani: महाजनी यांच्या शेवटच्या दिवसात काय घडलं? शेजाऱ्यांनी सांगितली महत्त्वाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या शेवटच्या दिवसात काय घडलं? शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 16 जुलै: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने सगळीकडेच खळबळ उडवली आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महाजनी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  पुण्यातील  तळेगाव दाभाडे येथील आंबी गावात ते भाड्याने घर घेऊन राहात होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. गेल्या आठ महिन्यांपासून महाजनी हे या सदनिकेत एकटेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली आहे. मागील 3 दिवसापासून ते घरातच पडून होते. मागील काही महिन्यांपासून ते भाडे तत्वावर राहत होते. मात्र शेजारी राहणाऱ्यांना देखील अभिनेते असल्याचे माहीत नव्हते. दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना कळवले असता ते घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही केली.

सफाई कामगार महिलेशी संवाद रवींद्र महाजनी यांनी सफाई कर्मचारी महिलेशी शेवटचा संवाद साधला होता. मंगळवार नंतर महाजनी यांनी फ्लॅटचे दारचं उघडले नाही. मी या इमारतीत दररोज कचरा घ्यायला यायचे. मंगळवारी मी त्यांना शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर मी त्यांना पाहिलं नाही. कचरा देताना ते थोडंफार बोलायचे, तेवढंच. त्याशिवाय माझा त्यांच्याशी काही संवाद झाला नाही. काल कचरा घ्यायला आल्यावर वास येऊ लागला तेव्हा मी माझ्या सरांना याबद्दलची माहिती दिली. नेहमी मी दरवाजा ठोकल्यानंतर त्यांचा आवाज यायचा, पण काल आतून काही आवाजही दिला नाही”, अशी माहिती सफाई कर्मचारी आदिका वारंगे यांनी दिली. कचरा दिलाच नाही “मंगळवारी मी त्यांना शेवटचं पाहिलं. त्यादिवशी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला. बुधवारी माझा वीकली ऑफ होता. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी दार ठोठावलं नाही. त्यांनी कचरा बाहेर ठेवला नव्हता. मी निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी जेव्हा मी आले तेव्हा दोन दिवसाचा कचरा असेल म्हणून दार ठोठावलं. पण आतून मला काहीच उत्तर मिळालं नाही”, असं सफाई कर्मचारी वारंगे यांनी पुढं सांगितलं. ‘अन् रक्ताची चिळकांडीच उडाली’कोल्हापूरात शुटींग सुरू असताना रवींद्र महाजनी यांच्यासोबत घडला होता भयंकर प्रकार महाजनी यांनी कुठले सिनेमे केले? अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यानंतर त्यांचं बालपण मुंबईत गेलं. पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या