JOIN US
मराठी बातम्या / पुणे / ज्याच्या शरिराचे लचके तोडले, मृत्यूनंतर त्यांचं काय होतं? बुधवार पेठेतील INSIDE STORY

ज्याच्या शरिराचे लचके तोडले, मृत्यूनंतर त्यांचं काय होतं? बुधवार पेठेतील INSIDE STORY

ज्या महिलांचे लचके समाज जिवंतपणी तोडतो? त्यांचं मृत्यूनंतर काय होतं? पाहा Inside Story

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 जुलै :  वेश्येचं घर म्हणजे समाजानं खांद्यावर घेतलेली तिरडी आहे. तिचे दफन होत नाही तोपर्यंत चर्चा ही होणारच,असं ज्येष्ठ लेखक सआदत हसन मंटो म्हणाले होते. प्रत्येक शहरातल्या भागात असलेल्या वेश्या वस्तीमधील स्त्रियांचे काही कॉमन प्रश्न आहेत. पुण्यातील बुधवार पेठ हा भाग रेड लाईट एरिया म्हणून बदनाम आहे. येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे जिवंतपणी हाल होतातच. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतरही कुणी पार्थिवाला हात लावायला तयार होत नाही. पुण्यातील एक महिला मात्र याला अपवाद ठरल्या आहेत. पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी राहणाऱ्या अलका गुजनाल या  महिलांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम अलका करतायत. जिवंतपणी प्रचंड वेदना सहन केल्यांनतर मृत्यूनंतर वेश्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायाला कोणीही पुढं येत नाही. त्यांचे कुटुंबीयही पाठ फिरवतात. या बेवारस महिलांसचा अंत्यविधी करण्याचं काम अलका करत आहेत. ती महिला ज्या धर्माची आहे, त्याप्रमाणे त्यांचं अंत्यविधी करत असल्याचं अलका यांनी सांगितलं.

अलका या बुधवार पेठेच्या रहिवाशी आहेत. त्यांनी या महिलांचे हाल जवळून पाहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या महिला दुसऱ्या राज्यांतून पुण्यात वेश्या व्यवसाय करण्यसाठी येत असल्याने त्यांचं कोणीही या ठिकाणी ओळखीचं नसतं. H1 N1 सारखा गंभीर आजर होऊन त्यांचं निधन झालं, तरी त्यांचा अंत्यविधी करणसाठी कोणीही उपस्थित नसतं.  कोव्हिड काळातही त्यांना हाल सहन करावे लागले.  त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मात्र त्यांना मदत कोणाची नसते. त्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून त्यांना शेवटच्या प्रवासात अलका साथ देत आहेत. अंधांसाठी ती झाली आधार, पुणेकर ताईचं काम पाहून कराल कौतुक ‘मी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. या काळात आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त महिलांचे अंत्यसंस्कार केले असून त्यासाठी लागणारा खर्च आम्ही स्वत: करतो,’ अशी माहिती अलका यांनी दिली. वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेची कथा वेदनादायी असते. त्यांना या व्यवसायाच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यांना त्यांच्या वेदना दिसत नाहीत. या स्त्रियांना समाजामध्ये योग्य स्थान मिळावं तसंच समाजानंही त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असं मत अलका यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या