JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / 'कोरोनामुळे कमी, आम्ही लॉकडाऊनमुळे मरू...', कडक निर्बंधांचा निषेध करण्यासाठी पुणेकर व्यापारी रस्त्यावर

'कोरोनामुळे कमी, आम्ही लॉकडाऊनमुळे मरू...', कडक निर्बंधांचा निषेध करण्यासाठी पुणेकर व्यापारी रस्त्यावर

पुण्यात व्यापारी असोसिएशनचे व्यापारी आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा त्यांनी निषेध केला आहे तसंच सरकारविरोधात बॅनरबाजी देखील केली आहे.

0106

आज पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते क्वार्टर गेट दरम्यान अडीच किलोमीटर च्या दरम्यान 8 ते 10 हजार व्यापारी दुतर्फा बॅनर घेऊन दुकाने बंद ठेवण्याच्या विरोधात उतरले होते

जाहिरात
0206

आम्हाला विरोधकांची फूस नाही, विकेंड लॉक डाऊन मान्य आहे मात्र पूर्णपणे दुकाने बंद ठेवायला विरोध आहे, अशी भूमिका यावेळी या व्यापाऱ्यांनी मांडली. 'कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊनसे मरेंगे हम..' असे बॅनर घेऊन पुण्यातील व्यापारी रस्त्यावर उतरले होते.

जाहिरात
0306

जर सरकारने ऐकलं नाही तर उद्या 9एप्रिलला सकाळी साडेदहा पासून पुण्यातील सर्व व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा पुणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

जाहिरात
0406

पुण्यातील व्यापाऱ्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा निषेध केला आहे. त्यांची मागणी आहे की सरकारने काही दिवस किंवा काही तास दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी.

जाहिरात
0506

सुमारे 10 लाख कामगार या व्यापाऱ्यांवर अवलंबून आहेत, शिवाय आता गुढीपाडवा तसंच इतर सणांना प्रारंभ होत आहे. अशावेळी व्यवसाय बंद ठेवणं या व्यापाऱ्यांना परवडणारं नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

जाहिरात
0606

दरम्यान 'लॉकडाऊन (weekend lockdown) किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. राज्यातील अनेक भागात अत्यावश्यक सेवा वगळता दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतरही आज व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या