petrol pump accident
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे : पुणे सातारा महामार्गावर एक भयंकर घटना समोर आली आहे. डिझेल भरण्यासाठी आलेल्या एक ट्रकने चक्क पेट्रोल पंपच उडवला आहे. ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक डिझेल पंपावर आदळला. डिझेल पंप खाली कोसळला आहे. हा भयंकर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुणे सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकने, डिझेल पंपला धडक देत पंप उखडला आहे. चालकाला अचानक चक्कर आल्याने, पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर हद्दीतील कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर हद्दीतील कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर प्रकार घडला. सुदैवाने जीवितहानी नाही, पेट्रोल पंपाच मात्र नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यात एकदोन नाहीतर तर तब्बल 5300 महिला साडी नेसुन धावल्या; काय आहे प्रकरण?सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पंपाच मात्र यात मोठं नुकसान झालंय.पंपावरील कर्मचारी थोडक्यात यामध्ये बचावला.डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या चारचाकी वाहनालाही ट्रकने धडक दिलीय.घटनेचा हा सर्व थरार cctv मधे कैद झाला आहे.
काचा तोडल्या, कागदं उधळली, पुणे विद्यापीठात कुलगुरूंच्या बैठकीतच अभाविपचा राडा PHOTOSहा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. ट्रक चालकाला चक्कर आल्याने त्याचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि डिझेलच्या पंपावर थेट गाडी गेली. यामुळे डिझेल पंपाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जखमी झाल्याची माहिती अजून मिळालेली नाही.