JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Accident : पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर पलटली; वाहतूक मंदावली

Pune Accident : पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर पलटली; वाहतूक मंदावली

भर पावसात पुण्याच्या चांदणी चौकात स्टेरिंग रॉड तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटा झाला. अपघातानंतर चौकात टेम्पो आडवा झाल्याने गाड्यांची वाहतूक काहीवेळ मंदावली होती.

जाहिरात

चांदणी चौकात उलटला ट्रक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे : राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. कुठे रस्ता खचतो आहे तर कुठे पाणी साचल्याने आधीच वाहतूक कोंडी झाली आहे. याच दरम्यान पुणेकरांसाठी एक वाईट बातमी आहे. चांदणी चौक परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आधीच पाऊस आणि त्यामध्ये हा अपघात झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात

पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात

भर पावसात पुण्याच्या चांदणी चौकात स्टेरिंग रॉड तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटा झाला. अपघातानंतर चौकात टेम्पो आडवा झाल्याने गाड्यांची वाहतूक काहीवेळ मंदावली होती. कर्वेनगर कडून हिंजवडीला जाताना टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Weather Update : आज पुण्यासह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

संबंधित बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार प्रवासी होते. सुदैवानं या अपघाता कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर किरकोळ जखम झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी झाला अपघात झाला. तुम्ही जर या मार्गानं प्रवास करणार असाल तर आधी ट्रॅफिकचे अपडेट पाहूनच बाहेर पडा. या अपघातामुळे वाहतूक मंदावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या