JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News: छंद माझा वेगळा, जोशी काकांनी जमवल्या तब्बल 250 हून अधिक गाड्या

Pune News: छंद माझा वेगळा, जोशी काकांनी जमवल्या तब्बल 250 हून अधिक गाड्या

प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतोच. पुण्यातील रत्नाकर जोशी यांना गाड्यांच्या प्रतिकृतींचा संग्रह करण्याचा अनोखा छंद आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 25 जून: प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतोच, जो त्याला जगण्यामधील आनंद देत असतो. आजपर्यंत तुम्ही नाणी-नोटा संग्रह करणे, अँटिक गोष्टींचा संग्रह करणे, जुन्या कॅसेट्स जमवणे असे आगळेवेगळे छंद ऐकले असतील. पण तुम्ही कधी गाड्यांच्या प्रतिकृतींचा संग्रह करण्याचा छंद ऐकला आहे? पुण्यातील रत्नाकर जोशी हाच छंद कित्येक वर्षांपासून जोपासत आहेत. त्यांच्याकडे 250 हून अधिक गाड्यांच्या प्रतिकृतींचा संग्रह आहे. या संग्रहामध्ये जुन्यापासून नव्या मॉडेल्सपर्यंत, परदेशींपासून भारतीय बनावटीच्या गाड्यांपर्यंत सर्व प्रकारांचा समावेश आहे. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी या छंदाला सामाजिक उद्देशाची जोड दिली आहे. कधी जडला छंद? रत्नाकर जोशी यांना 1986 साली पहिली मर्सिडीज मिळाली आणि तेव्हापासून त्यांना गाड्यांचा संग्रह करण्याचा नाद लागला. पुढे आरटीओतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मनसोक्त आपला हा छंद जोपासायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या घरच्यांना हा छंद वेडावाकडा वाटला. परंतु जसजसे जोशी हा संग्रह लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन गेले तसतसे लोकांचा उत्सफूर्त आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. पुढे त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा यामध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी 200 परदेशी बनावटीच्या तर 50 गाड्या भारतीय बनावटीच्या अशा एकूण 250 गाड्यांचा संग्रह केला आहे. यामधील बऱ्याचशा गाड्या या 1918 मॉडेलच्या आहेत.

छंदाला दिली सामाजिक जागृतीची जोड जोशी यांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या छंदाद्वारे रस्ता सुरक्षा, वाहन नियम यांसारख्या विषयांवर जागृती करायचे ठरवले. त्यासाठी ते वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन तेथे आपल्या मोटारींचे प्रदर्शन भरवू लागले. आजपर्यंत त्यांने अनेक प्रदर्शन भरवली आहेत आणि विद्यार्थयांना वाहतूक सुरक्षा विषयामध्ये गोडी निर्माण करत नियमांचे धडे दिले आहेत. याचबरोबर या प्रदर्शनाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणारी प्रभावी व्यंगचित्रे! अनेक शब्द जे काम करणार नाहीत ते ही व्यंगचित्रे करत आहेत. त्यांच्या गाड्यांच्या या संग्रहाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेसुद्धा घेतली आहे. 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO वाहतुकीचे नियम बिंबवण्यासाठी प्रदर्शन नुसतंच कुणी जर सांगितलं की मी वाहतुकीच्या चिन्हांची माहिती देतो तर कुणीच ऐकणार नाही. परंतु हीच माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मी माझ्या मोटारींच्या प्रदर्शनातून सांगतो. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने अपघात होऊन दरवर्षी 10 हजारहून जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. म्हणूनच देशाचे भविष्य असणाऱ्या 9 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर वाहतुकीचे नियम बिंबवण्यासाठी मी प्रदर्शन घेतो. माझे कुटुंबीयसुद्धा मला प्रदर्शनामध्ये मदत करतात, अशी माहिती रत्नाकर जोशी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या