JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल, असा साप आढळला पुण्यात, Video

Pune News : तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल, असा साप आढळला पुण्यात, Video

पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीत अतीदुर्मिळ जीवांच्या गटात मोडणारा मांजऱ्या साप आढळला. अनेक पुणेकरांनी हा साप पहिल्यांदाच पाहिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 12 जुलै :  पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीत अतीदुर्मिळ जीवांच्या गटात मोडणारा मांजऱ्या साप आढळला. या प्रकारचा साप अनेक पुणेकरांनी पहिल्यादांच पाहिला. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन्यजीव रक्षकांनी हा साप वेळीच तााब्यात घेतला. पण हा साप नेमका आहे तरी कसा याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. कसा असतो मांजऱ्या साप? मांजऱ्या सापाला Common Cat Snake असे देखील म्हटलं जातं. फिकट राखाडी तसेच काहीसे पिवळे रंग असणाऱ्या या मांजऱ्याच्या शरीरावर गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते. डोक्यावर तपकीरी किंवा काळे लहान लहान ठिपके, डोळ्याच्या मागून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष, पोट पांढरे त्यावर छोटे छोटे काळे ठिपके, मानेपेक्षा डोके मोठे, मोठे डोळे, लांबट शेपूट असते.

मांजऱ्याचा अधिवास शक्यतो बांबूचे बेट, घनदाट जंगले आणि दाट झाडी असणाऱ्या ठिकाणी असतो. अत्यंत दुर्मिळ, निशाचर, दिवसा बांबुचे बेट, झाडाच्या ढोलीत किंवा दगडाखाली बहुतांश वेळा रात्रीच आढळतो. या सापाला डिवचलं तर शरीराचे वेटोळे करुन हल्ला करतो. त्याचबरोबर शेपटीचे टोक उंच उभे करुन जोरजोरात हलवतो. या सापाचे विषारी दात जबड्यातील मागे असतात. हा साप निमविषारी आहे. आपल्या भागात खूप वर्षांनी हा सर्प आढळुन आला आहे. पावसाळा सुरू झाला असून साप बाहेर पडत आहेत. साप आढळून आल्यास घाबरून न जाता आपल्या जवळच्या सर्पमित्राना संपर्क साधावा,’ असे आवाहन सर्पमित्र राजू कदम यांनी केला. साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? मांजऱ्या साप विषारी आहे का? युरोपियन मांजर साप हा निमविषारी आहे , परंतु तो मागील बाजूचा फॅन्ग असल्यामुळे (वरच्या जबड्याच्या मागील बाजूस फॅन्ग असतात), तो बचावात्मक चावताना त्याचे विष क्वचितच टोचतो, आणि त्यामुळे मानवांना धोका नाही असे मानले जाते. हे प्रामुख्याने गेको आणि सरडे खातात.फुरसे या विषारी सापा सारखी रंगसंगती असल्याने , फुरस अन मांजऱ्या ओळखण्यात चूक होऊ शकते अशी माहिती सर्पमित्र यांनी दिली. मांजऱ्या साप काय खातो ? छोटेपक्षी, उंदीर, पाल, सरडे हे या सापाचे अन्न असून तो निशाचर आहे. या सापाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो हल्ला करताना फुत्कारतो. तसेच झाडावर उत्तम पद्धतीनं चढतो. पश्चिम घाटात हा साप आढळतो, असं कदम यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या