प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 13 जून : गेल्या साडे तीनशे वर्षांपासून पंढरपूरची वारी ही परंपरा सुरू आहे. 11 जून रोजी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. तसेच संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यात मुक्कामास होती. या वारीत वृद्ध, अपंग वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अशा वारकऱ्यांना पुण्यातील मुस्लिम रिक्षाचालकांनी मोफत सेवा पुरवली आहे. आळंदी पासून पालखी मुक्काम स्थळापर्यंत या रिक्षाचालकांनी वारकऱ्यांना मोफत सेवा दिली आहे. पहिल्यांदाच हा उपक्रम आठ वर्षांपासून पुण्यात रिक्षा चालवणारे असिफ अली मोहम्मद सय्यद हे या वर्षी पहिल्यांदाच हा उपक्रम राबवत होते. पण वारकऱ्यांना ही सेवा दिल्याने मी खूप सुखात झोपलो अशी झोप मला कधीच लागली नव्हती आणि इतका आनंदही कधीच झाला नव्हता. धर्म,पंथ,जात काहीच महत्वाचं नसतं. आपण माणूस आहोत हाच आपला पहिला आणि शेवटचा धर्म असल्याचं मोहम्मद सय्यद यांनी सांगितले.
या सेवेबद्दल रिक्षा चालक फय्याज मोमीन सांगतात, सर्वधर्म समभाव मानणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देताना मला खूप आनंद होत आहे. वारकऱ्यांनी देखील हा दुसऱ्या धर्मातील आहे असं पाहिलं नाही. रिक्षातून उतरल्यावर आमच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिले. याचा आज सगळ्यात जास्त आनंद होत आहे.
Ashadhi Wari 2023: ना कोणता रंग, ना धर्म, अशी असते वारी, एकतेचा संदेश देणारा खास Video
दुसरीकडे वारकरी सुद्धा या मानवतेचा संदेश देणाऱ्या रिक्षाचालकांच्या सेवेने भारावून गेलेले आहेत. वारीत काहीच भेदभाव नसतो यांच्यात देखील विठ्ठल आहे असं म्हणताना साडे तीनशे वर्ष वारीची वैभवशाली परंपरा तितक्याच उत्साहात का सुरु आहे हेच यामधून दिसून येतं.